शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

आईने वाचविले ‘हिरा’ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:03 IST

पालकांनी तरसाच्या तोंडातून बालकाला वाचवले हिमतीने : वनविभागाने घेतले ठसे

ठळक मुद्देआईचा दगड तरसाच्या जबड्यावर२० मिनिटे सुरू होती लढाईखेतिया येथे बाजारासाठी चालले होते पायी

लोकमत न्यूज नेटवर्कखेतिया : मध्य प्रदेशातील खेतिया येथे आठवडे बाजारासाठी जात असताना तरसाने केलेल्या हल्ल्यात सहा वर्षीय बालक जखमी झाला़ त्याच्या पालकांनी तरसाचा मोठ्या हिमतीने सामना करून मुलाला मृत्यूची दाढेतून बाहेर काढले़पहलानी (मलगाव) येथील रहिवासी पांडू अमदिया, पत्नी तिरमाबाई आणि मुलगा हिरा हे तिघे पहाटे साडेपाच वाजता खेतिया येथे पायी जात असताना मलगाव-खेतिया रस्त्यावरील उद्धव यादव पाटील यांच्या शेताजवळ शिकारीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरसाने सहा वर्षीय हिरावर हल्ला केला.खेतिया येथील सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी राजकमल आर्य व त्यांच्या सहकाºयांनी रुग्णालयात जाऊन सहा वर्षीय हिराची प्रकृती जाणून घेतली़ यानंतर वनाधिकारी व कर्मचाºयांनी हल्ला झालेल्या ठिकाणी तरसाच्या पावलांचे ठसेही घेतले़या घटनेनंतर वनविभागाकडून या भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावून या भागातील वन्य प्राण्यांची माहिती संकलित करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे़असा वाचविला ‘हिरा’हिरा याचा हात जबड्यात धरून तरसाने ओढण्यास सुरुवात केली़ ते पाहून पालकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली़ दोघांनी प्रसंगावधान राखत दगड आणि काठीने तरसावर हल्ला केला़ तिरमाबाईच्या हातून सुटलेला एक दगड तरसाच्या जबड्याला बसल्याने त्याने हिराचा हात सोडून पळ काढला़ २० मिनिटे सुरू असलेल्या या लढाईत हिराला खोल जखमा झाल्या आहेत़ त्याच्यावर खेतिया प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर इंदूर येथे हलवण्यात आले आहे़