शहरं
Join us  
Trending Stories
1
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
2
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
3
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
4
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
5
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
6
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!
7
जसप्रीत बुमराहने वाढवलं BCCIचं टेन्शन, टीम इंडियातून इंग्लंड दौऱ्यावर फक्त इतकेच सामने खेळणार
8
ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या
9
मुंबई-दिल्ली महामार्गावर कार थांबवली, महिलेसोबत सुरू केले अश्लील चाळे, भाजपा नेत्याचा व्हिडीओ व्हायरल 
10
२५ लाख रोजगार, ७५ हजार कोटींची गुंतवणूक! मुकेश अंबानी 'या' राज्यातील तरुणांचं बदलणार भविष्य
11
भारत पाकिस्तानला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत; FATF ग्रे लिस्टमध्ये येणार पाक...
12
'धरीला पंढरीचा चोर' गाण्यातील 'मुक्ता'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन! सध्या काय करते अभिनेत्री?
13
Ritual: 'हुंडा देणे' ही कुप्रथा भारतीय संस्कृतीत वा इतिहासात नव्हतीच, मग आली कुठून?
14
शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले? डिमॅट अकाउंट कायमचं कसं बंद करायचं? 'ही' आहे सोपी पद्धत
15
पीडित तरुणीचे आरोपीवर प्रेम, लग्नही केले; सर्वोच्च न्यायालयाला बदलावा लागला आपलाच निर्णय...
16
बीडमधील पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत; सुरक्षारक्षकांचा चोरट्यांवर गोळीबार, एक ठार
17
मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला
18
"तिला घटस्फोट दे, नाहीतर तुला जिवे मारू’’, पत्नीच्या प्रियकराने दिलेल्या धमकीमुळे पती घाबरला, त्यानंतर...  
19
बिटकॉइन म्हणजे काय? ते कोण बनवतं? बँकेशिवाय कसं काम करतं? वाचा!
20
Vaishnavi Hagawane Death Case : राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?, समोर आली मोठी माहिती

नाशिक विभागात नंदुरबार जिल्ह्यात मनरेगाचे सर्वाधिक मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेले मजूर गावी परतल्याने या मजुरांना रोजगार देण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेले मजूर गावी परतल्याने या मजुरांना रोजगार देण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येत असून त्यामुळे मनरेगावरील कामांवरील मजुरांची संख्या तब्बल ५० हजाराच्या घरात गेली आहे. विशेष म्हणजे नाशिक विभागात जिल्ह्यात सर्वाधिक मजूर कामावर असल्याची नोंद झाली आहे.परजिल्ह्यात आणि परराज्यात अडकलेले हजारो मजूर जिल्ह्यात परतू लागले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश मजुर गुजरात राज्यात जातात गेल्या महिन्यातच हे मजूर परतल्याने १४ दिवसांच्या क्वॉरंटाईननंतर या मजुरांना रोहयोच्या कामांकडे वळविण्यात प्रशासनाला यश येत आहे. जिल्ह्यात रोजगाराची साधने नसल्याने आणि दारिद्रय रेषेखालील कुटूंबांची संख्या ७० टक्केपेक्षा अधीक असल्याने लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील जनतेला पुरेसे अन्नधान्य अथवा रोजगार उपलब्ध करून देणे प्रशासनापुढे आव्हान होते. ही बाब जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी लक्षात घेवून सुरुवातीपासूनच धान्य वाटप व रोहयोच्या कामांकडे लक्ष घालून त्याचे नियोजन केले.मजूर परतण्यापूर्वीच सुमारे ६० हजार मजुरांना रोजगार मिळेल इतक्या कामांना तांत्रिक मंजुरी दिली होती. त्यामुळे मजूर परतल्यानंतर या मजुरांना ज्यांनी काम मागितले त्यांना काम देण्याला प्राधान्य दिले जात असल्याने अवघ्या तीन आठवड्यात रोहयोची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू झाली असून या कामांवरील मजुरांची संख्याही वाढली आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात ४,३३० कामांवर ४६ हजार २९४ मजूर कामावर आहेत. लवकरच ही संख्या ५० हजारांवर जाणार आहे. तालुकानिहाय सुरू असलेली कामे व त्यावरील मजूर पुढील प्रमाणे, अक्कलकुवा तालुक्यात ६०७ कामांवर ७,८०१ मजूर कार्यरत आहेत. धडगाव तालुक्यात ४५० कामांवर १२,२३४ मजूर उपस्थित आहेत. नंदुरबार तालुक्यात ६६० कामांवर सहा हजार ४६ मजूर उपस्थित आहेत.नवापूर तालुक्यात ७४१ कामांवर ९,१८० मजूर कार्यरत आहेत. शहादा तालुक्यात एक हजार ५३ कामांवर ६,६०८ मजूर कार्यरत आहेत. तर तळोदा तालुक्यात ८१९ कामांवर ४,२२५ मजूर कार्यरत आहेत. यात जॉबकार्ड नसलेले १४,९६० मजुरांचा समावेश आहे.एकुण कामांवरील मजुरांची संख्या तब्बल ५० हजारापेक्षा अधीक जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने ठेवलेल्या लक्षांकापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न आहे. मजुरांनी आपल्या परिसरातच काम उपलब्ध व्हावे यासाठी कामाची मागणी करावी असे आवाहन देखील जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

जिल्ह्यात मागेल त्याला काम देण्याचे नियोजन प्रशासनाने केले असून रोहयोच्या कामाचे पुर्वनियोजन केल्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर मजुरांना काम देता येत आहे.-डॉ.राजेंद्र भारूड, जिल्हाधिकारी.