शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

जिल्ह्यात आज दीडशेपेक्षा अधीक लग्न समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मार्च महिन्यातील १९ तारीख ही सर्वात मोठी लग्नतिथी असून पोलीस प्रशासनाकडे असलेल्या नोंदीनुसार १५८ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मार्च महिन्यातील १९ तारीख ही सर्वात मोठी लग्नतिथी असून पोलीस प्रशासनाकडे असलेल्या नोंदीनुसार १५८ ठिकाणी लग्नसमारंभ आहेत. अशा लग्न समारंभांमध्ये कमीत कमी उपस्थिती राहावी व आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाव्या अशा सुचना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आल्या आहेत. आजचा दिवस प्रशासनासाठी मोठ्या कसोटीचा ठरणार आहे.एकाच ठिकाणी जास्त गर्दी होऊ नये व त्यादरम्यान कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी प्रशासनाने सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. शाळा, महाविद्यालयांना सुट्टया देण्यात आल्या आहेत. परंतु खाजगी स्वरूपात आयोजित लग्न समारंभांवर प्रशासनाला नियंत्रण मिळविणे कठीण होऊन बसले आहे. पूर्वनियोजनानुसार १९ मार्च रोजी मोठ्या प्रमाणावर लग्न समारंभ आहेत. पोलिसांनी काढलेल्या माहितीनुसार, १५८ ठिकाणी लग्न समारंभ असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र त्यापेक्षा अधीक ठिकाणी गुरुवार, १९ रोजी लग्न समारंभ असण्याची शक्यता आहे.खाजगी मंगल कार्यालये, सामाजिक सभागृहांमध्ये १९ तारखेनंतर लग्न समारंभ आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु गुरुवारच्या लग्न समारंभांवर नियंत्रण ठेवणे मोठे जिकरीचे ठरणार आहे.लग्न समारंभ आयोजक आणि स्वत: नागरिकांनी दक्षता घेवून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकमेकांशी जास्त संपर्क होणार नाही याची काळजी घ्यावी. वेळोवेळी हात स्वच्छ धुवावे. खोकतांना आणि शिंकतांना रुमालचा वापर करावा. कमीत कमी उपस्थिती राहील याची काळजी घ्यावी.लवकरात लवकर समारंभ कसा आटोपेल यासाठी प्रयत्न करावा. वृद्ध आणि लहान मुलं यांना गर्दीच्या ठिकाणापासून दूर ठेवावे किंवा त्यांना घराबाहेर पडू देवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.