शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

स्मृती जतन करण्यासाठी स्मारकाचा विकास व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 11:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रावलापाणी येथे इंग्रजांच्या गोळीबारात धारातिर्थ पडलेल्या आदिवासी क्रांतीकारकांच्या स्मारकाचा विकास लवकर व्हावा व या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रावलापाणी येथे इंग्रजांच्या गोळीबारात धारातिर्थ पडलेल्या आदिवासी क्रांतीकारकांच्या स्मारकाचा विकास लवकर व्हावा व या ऐतिहासिक स्थळाला नावारुपाला आणावे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. येथील खडकावरील गोळीबाराच्या खुणा जपल्या जाव्यात व स्वातंत्र्य संग्रामाचे मोठे स्मारक व्हावे. त्यातून समाजाला प्रेरणा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.सातपुड्यातील दुर्गम भागात असलेल्या रावलापाणी येथे २ मार्च रोजी १९४३ रोजी इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात १५ क्रांतीकारक शहीद झाले होते. या स्मारकाचा विकास व्हावा यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू आहेत. परंतु अपेक्षीत दखल घेतली जात नाही. या स्मारकाचा विकास झाल्यास हे एक चांगले पर्यटनस्थळ देखील होऊ शकणार आहे.या घटनेचा इतिहास मोठा प्रेरणादायी आहे. १९४२ च्या चलेजाव चळवळीमुळे देश पेटून उठला होता.त्याआधी पश्चिम खान्देश जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी आप चळवळीचे संत श्री रामदास महाराज यांच्यावर १० जून १९४१ रोजी पहिली बंदी आणली. २४ आॅक्टोबर १९४१ ला जावली (गंगठा संस्थान) येथे दंगा झाला. आप धर्मियांवर अत्याचार झालेत. जाळपोळ झाली. यावेळी आरतीवर बंदीची मागणी लावून धरण्यात आली. ३० आॅक्टोबर १९४१ रोजी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी मोरवड येथे कलम १४४ लावून आरतीवर सक्तीने बंदी आणली. नंतरच्या काळात अर्थात २३ एप्रिल १९४२ रोजी संत रामदास महाराज व इतर ३० अनुयायी यांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले गेले.तत्कालीन पश्चिम खान्देश जिल्ह्यातील आदिवासी, गोर-गरिबांचा या चळवळीत प्रत्यक्ष सहभाग व्हावा म्हणून तत्कालीन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब ठकार यांनी आप चळवळीचे प्रमुख संत श्री. रामदास महाराज यांना दोन वर्षाच्या हद्दपारीची शिक्षा भोगत असतांना प्रत्यक्ष आवाहन केले.आपली हद्दपारीची मुदत संपलेली नसतांना चलेजाव चळवळीला आपल्या संघटन शक्तीतून मोठे बळ देण्याच्या हेतूने, क्रांतीकारकांच्या पाठीशी भक्कमपणे राहण्यासाठी वाटचाल करणाºया आप समुदायाला बन, ता.तळोदा येथून ५ किलोमिटर अंतरावर लक्ष केले गेले. ४ मार्च रोजी महाशिवरात्रला आरतीला पोहचण्यासाठी हा जत्था निघाला होता. २ मार्च रोजी निझरा नदीच्या पात्रात हजारोच्या संख्येने मुक्कामाला असणाºया समाजावर बेछूट गोळीबार केला गेला. कॅप्टन ड्युमन याच्या आदेशावरून गोळीबार झाला त्यात १५ जण शहीद झाले. परंतु कोण शहीद झाले त्यांची नावे उपलब्ध नाहीत.गोळीबार एवढा अमानुष होता की ८० वर्षापूर्वी झालेल्या गोळीबाराच्या खूना आजही दगडांवर स्पष्टपणे दिसून येतात. यासंदर्भात तळोदा पोलिसात त्यावेळी दोन गुन्हे दाखल झाले. ३०० पेक्षा अधीक जणांना आरोपी केले गेले.या सर्वांचे नेतृत्व संत रामदास महाराज करीत होते. अशा या ऐतिहासिक स्थळाचा विकासासाठी सर्व घटकांकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे.