लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : अक्कलकुवा ते मोलगी रस्त्यावर डाब देवगोई जवळील मालीआबांपाडय़ाजवळ मंगळवारी रात्री दरड कोसळल्याने वाहतूक रात्रीपासून बंद होती़ दरम्यान बुधवारी पहाटे मार्गावर रस्त्यालगत झाड ही उन्मळून पडल्याने रस्ता पुन्हा बंद झाला तर पावसामुळे घराची भिंत कोसळली़ अक्कलकुवा तालुक्याच्या दुर्गम भागात संततधार पाऊस सुरु आह़े यातून जागोजागी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत़ यातून रस्ते बंद झाल्याने सातपुडय़ातील काही गाव-पाडे संपर्कहीन झाली आहेत़ मंगळवारी रात्री उशिरा पावसाच्या संततधारेमुळे डाबच्या देवगोई पाडय़ातील किरजा नाना वसावे यांच्या कौलारु घराची भिंत पावसामुळे कोसळली़ देवगोई घाटात दोन दिवसापूर्वी कोसळलेली दरड व उन्मळून पडलेली झाडे संबधित विभागाने लागलीच जेसीबी च्या सहाय्याने बाजूला करीत रस्ता सुरळीत सुरू केला होता. मात्र मंगळवारी रात्री पुन्हा याच घाटात मालीआबापाडा जवळ रस्त्याच्या बाजूला दरड कोसळली़ दरडीचा मलबा रस्त्यावर पडल्याने मार्गावरील प्रवासी आणि खाजगी वाहतूक बंद पडली़ दरदिवशी दरड कोसळून रस्ता बंद होत असल्याने प्रशासनाने गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी भाजपचे प्रदेश सदस्य नागेश पाडवी, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष धनसिंग वसावे यांच्यासह परिसरातील आदिवासी बांधवांनी प्रशासनाकडे केली आह़े दरडींचे व्यवस्थापनच गेल्या काही वर्षात झालेले नसल्याने हे प्रकार होत असल्याचे सांगण्यात येत आह़े दरडींमुळे गेल्या 15 दिवसांपासून मोलगी परिसरातील काही गावांमध्ये संपर्कच झालेला नसल्याचे सांगण्यात येत आह़े
दरड कोसळल्याने मोलगी-अक्कलकुवा रस्ता बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 20:34 IST