लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मित्रासोबत नाते संपुष्टात आल्यानंतर सैरभैर झालेल्या एका युवतीने मित्राच्या बहिणीची सोशल मिडियात बदनामी करुन विनयभंग केल्याचा प्रकार शहरात उघडकीस आला आह़े याप्रकरणी बदनामी करणा:या युवतीविरोधात गुन्हा दाखल आह़े शहरातील अज्ञात युवतीने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या भावाचे एका मुलीसोबत मैत्रीचे नाते होत़े 2017 पासून सुरु असलेले हे नाते काही दिवसांपूर्वी संपुष्टात आले होत़े दरम्यान घटनेच्या काही दिवसानंतर फिर्यादी युवतीच्या नावाने फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर अलि पोस्ट फिरु लागल्या़ मोबाईलवरही घाणेरडे संदेश येण्यास सुरुवात झाली़ याचा पिडित युवतीने तपास सुरु केला असता भावासोबत नाते असलेल्या ‘तिने’च हा प्रकार केल्याचे समोर आल़े याबाबत तिने संशयित युवती आणि तिच्या कुटूंबियांसोबत बोलण्याचा प्रयत्नही करुन पाहिला़ परंतू नाते तुटल्यानंतर सूड भावनेने पछाडलेल्या तिने पिडित युवतीची बदनामी सुरुच ठेवली होती़ 15 दिवसांपासून सुरु असलेल्या या प्रकाराला कंटाळून युवतीने अखेर शहर पोलीस ठाणे गाठून बदनामी करणा:या ‘त्या’ युवतीविरोधात गुन्हा दाखल केला आह़े घटनेतील पिडीत फिर्यादी युवती आणि संशयित आरोपी युवती ह्या दोन्हीही अल्पवयीन असल्याची माहिती आह़े पोलीसांकडून या संवेदनशील गुन्ह्याचा तपास सुरु असून आह़े संशयित युवतीविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील विविध कलमांसह विनयभंगाचाही गुन्हा दाखल करण्यात आला आह़े अत्यंत खळबळजनक अशा या प्रकाराची शहरात एकच चर्चा सुरु असून पालकांकडून संतापही व्यक्त होत आह़े तपास पोलीस निरीक्षक एस़डी़नंदवाळकर करत आहेत़
बदनामी करणा:या युवतीने सोशल मिडियात पिडित युवतीचा मोबाईल नंबर टाकून बदनामी केली होती़ तसेच वेळोवेळी चॅटींग करुन पिडित युवतीच्या आई आणि भावालाही शिवीगाळ करुन दमदाटी केली होती़ बदनामी करण्यासाठी युवतीकडून फेसबुकवर पिडितेच्या नावाने बनावट अकाउंट तयार करुन त्यावर बदनामी केली गेली होती़