लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धडगाव तालुक्यातील मोख बुद्रुक येथील पाटीलपाडा गावात महिलेस किरकोळ वादातून डेंगाऱ्याने मारहाण करण्यात आली़ २२ जुलै रोजी ही घटना घडली़रत्नाबाई गोरख्या पाडवी असे महिलेचे नाव आहे़ गायरानात गुरे घुसल्याच्या वादातून तिला टेडा फुलजी वसावे याने महिलेच्या घरासमोर लाकडी डेंगाºयाने बेदम मारहाण केली़ महिलेच्या फिर्यादीवरून टेडा वसावे याच्याविरूद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
मोख बुद्रुकचा पाटीलपाडा येथे महिलेस मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 21:15 IST