आय.जी.पठाण ।नवापूर : गेल्या निवडणुकीत मोदी लाटेतही काँग्रेसला मताधिक्य देणाऱ्या नवापूर विधानसभा मतदार संघातून यंदा कुणाला व किती मताधिक्य मिळते यावर आगामी विधानसभा निवडणुकीची मदार अवलंबून असणार आहे. परिणामी सर्व इच्छुक आपापल्या परीने मोचेर्बांधणी करीत आहेत.धुळे व नंदुरबार जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून नवापूरची आजवर ओळख राहिली आहे. नवापूर विधानसभा मतदारसंघाची व्याप्ती तालुक्यासह नंदुरबार तालुक्यातील आष्टे व धानोरा या दोन जिल्हा परिषद गटातील भाग अशी आहे.सतत नऊ वेळा माणिकराव गावीत यांनी काँग्रेस पक्षाकडुन नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. किंबहुना त्यांच्याच नावे मतदारसंघ आजवर ओळखला गेला. पहिल्यांदाच काँग्रेस कडुन लोकसभेसाठी नवापूर तालुक्या बाहेरील उमेदवार देण्यात आला आहे. जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष भरत गावीत व आ. अॅड. के. सी. पाडवी या दोंघामधुन आ. अॅड. के. सी. पाडवी यांच्या उमेदवारीवर शिक्का मोर्तब झाला असून उमेदवारी देण्यावरुन उद्भवलेली राजकिय असंमजसाची स्थिती निवळली आहे.नवापूर विधानसभा मतदार संघात काँग्रेस उमेदवार माणिकराव गावीत यांना एक लाख ४४५ मते तर भाजपा उमेदवार डॉ. हिना गावीत यांना ८७ हजार ५२७ मते मिळाली होती. नवापूर मतदारसंघात एक लाख ९८ हजार ८१३ मतदारांनी मतदान केले होते. त्यात तीन हजार ७६२ मतदारांनी नोटा हा विकल्प निवडला होता. मतांचा फरक पाहता मोदी लाटेतही काँग्रेसला भाजपा पेक्षा १२ हजार ९१८ मते जास्त मिळाली होती. लोकसभा मतदारसंघात इतर विधानसभा मतदारसंघात मात्र भाजपला काँग्रेस पेक्षा जास्त मते मिळाली होती हे विशेष. यंदाच्या निवडणुकीत माजी खासदार माणिकराव गावीत व भरत गावीत यांची नाराजी दुर झाली असली तरी सहयोगी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसला सहकार्य न करण्याचे ठरवले आहे. यंदा प्रथमच नवापूरला उमेदवारी मिळालेली नाही. स्थानिक उमेदवार नसल्याने या पार्श्वभूमीवर यंदा काँग्रेसला नवापूर विधानसभा मतदारसंघात भाजपा पेक्षा अधिक मते मिळतात की भाजपा उमेदवार जास्तीची मते घेऊन जातात हे मतमोजणीतूनच स्पष्ट होऊ शकेल. एकंदरीत पक्षांतर्गत गटबाजी बाजुला सारुन जे राजकीय पक्ष सर्व ताकद निवडणुकीच्या रिंगणात दाखवतील त्यांनाच यशाची फळे चाखायला मिळतील हे स्पष्ट आहे.नंदुरबार लोकसभेवर काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा स्थापित करण्यासाठी जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुरुपसिंग नाईक, माजी खासदार माणिकराव गावीत, आ. अमरीशभाई पटेल, आ. चंद्रकांत रघुवंशी, आमदार डी.एस. अहिरे, आमदार काशिराम पावरा, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिपक पाटील, माजी मंत्री अॅड. पदमाकर वळवी, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष भरत गावीत, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरिष नाईक यांच्यासारखे अनुभव संपन्न लोकप्रतिनिधींनी प्रयत्नांना सुरुवात केली आहे.यंदा मतदार वाढलेनवापूर मतदार संघात मतदारांची संख्या तब्बल ४० हजाराने वाढली आहे. त्यात नव्याने मतदानाचा हक्क मिळालेल्या नवोदित मतदारांची संख्या जास्त आहे. महिला मतदार एक लाख ३८ हजार ७०० तर पुरुष मतदार एक लाख ४४ हजार ९४६ असे एकुण दोन लाख ८३ हजार ६४७ मतदार आहेत. नवोदित मतदार व युवा मतदार जास्त असल्याने त्यांची भूमिका निर्णायक ठरु शकते.मतदारसंघातील प्रचाराचे नियोजन कसे होते? मतदार संघाच्या मुलभुत समस्या, रोजगाराचा प्रश्न, नागरीकांच्या अपेक्षा, बेरोजगारी, स्थलांतराची समस्या व आतापर्यत झालेला विकास या सर्व मुद्यांवर निवडणुकीचा प्रचार होतो की अन्य मुद्दांवर ही निवडणूक होते? यावरही निवडून येणाºया उमेदवाराचे विधानसभा क्षेत्रातील मताधिक्य अवलंबून राहणार आहे.
मोदी लाटेतही काँग्रेसला मताधिक्य देणाऱ्या नवापुरच्या भुमिकेकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 12:25 IST