लोकमत न्यूज नेटवर्कचिंचपाडा : नवापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार शिरीष नाईक यांनी चिंचपाडा ता. नवापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला धावती भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील सुविधांची पाहणी करीत आरोग्य शिबीरे राबविण्याच्या सूचना केल्या.आमदार नाईक यांच्या भेटीप्रसंगी पंचायत सभापती रतिलाल कोकणी, उपसभापती अंशिता गावीत, जि.प.सदस्य शैलेश वसावे, पंचायत समिती सदस्य ललीता वसावे, कांतीलाल गावीत, धिरसिंग गावीत, राहुल वसावे, तालुका वैद्यकीय अधिकारी हरिश्चंद्र कोकणी, वैद्यकीय अधिकारी जनाबाई सुर्यवंशी, डॉ.निलेश विभूते आदी उपस्थित होते. यावेळी आमदार नाईक यांनी ोथील सुविधांचा आढावा घेतला. तर प्रसुती व कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या रुग्णांशी त्यांनी संवादही साधला.परिसरातील लहान - मोठ्या आजारांवर मात करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत व्यसनमुक्ती विषयक उपक्रम राबवत क्षयरोग, कुपोषण मुक्तीसाठीही आरोग्य शिबीर घ्यावे, तर प्रसुती व कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या रुग्णांशी त्यांनी संवादही साधण्याच्या सूचना आरोग्य अधिकाऱ्यांना केली.
चिंचपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांची आमदारांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 12:39 IST