लोकमत न्यूज नेटवर्ककोळदा : तळोदा तालुक्यातील आमलाड ते धानोरा दरम्यान पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे खचलेल्या रस्त्याची आमदार राजेश पाडवी यांनी पाहणी केली. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र रस्त्यांची व पुलांची दुरवस्था झाली आहे. अशातच तळोदा तालुक्यातील आमलाड ते धानोरा दरम्यान असलेल्या नाल्याला पूर आल्याने पाण्याचा तीव्र प्रवाहामुळे रस्ता खचला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. धानोरा तसेच इतर गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवरची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती.याशिवाय धानोरा परिसरात रस्त्याच्या दुरवस्थेबाबतदेखील नागरिकांच्या मोठ्या तक्रारी होत्या. त्या पार्श्वभूमीवर शहादा-तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनी आमलाड ते धानोरा रस्ता, खेडला ते पिसावर पुल, कढेल ते धानोरा रस्ता, धानोरा ते तºहावद रस्त्याची पाहणी केली.याप्रसंगी स्विय सहायक वीरसिंग पाडवी, माजी सभापती जितेंद्र पाडवी, नारायण ठाकरे आदिवासी मोर्चा जिल्हा सरचिटणीस, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष चेतन गोसावी, रणजित चौधरी, बापू पाटील, दिलीप ठाकरे, कृष्णा गोसावी, नीलेश राजपूत आदी उपस्थित होते.
आमलाड-धानोरा खचलेल्या रस्त्याची आमदारांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 12:27 IST