लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील पालिका रुग्णालयाच्या इमारतीत सुरू असलेल्या ग्रामीण रुग्णालयाची पाहणी आमदार राजेश पाडवी यांनी केली. पाहणी दरम्यान रुग्णालयात परिसरात घाणीचे साम्राज्य असल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत प्रशासनाला जाब विचारला. शवविच्छेदन गृहाची तत्काळ दुरूस्ती करण्याचे आदेश त्यांनी या वेळी दिले. कर्मचाऱ्यांशी ही संवाद साधत त्यांच्या तक्रारी व अडचणी जाणून घेतल्या.गेल्या अनेक वर्षांपासून शहादा ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न कायम असून, येथे कायमस्वरूपी डॉक्टर व वैद्यकीय अधिकारी नसल्याने नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते. त्याचप्रमाणे शवविच्छेदन गृह नादुरुस्त असल्याने शहरापासून १५ किलोमीटर अंतरावरील म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्रात अपघातातील मयतांचे शवविच्छेदन करावे लागत होते. याबाबत लोकप्रतिनिधी नागरिक संवाद मंचाच्या सदस्यांनी आमदारांशी संवाद साधून रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत लेखी निवेदन देऊन यावर उपायोजना करण्यासह येथे कायमस्वरूपी डॉक्टरांची नेमणूक करावी अशी मागणी केली होती.या पार्श्वभूमीवर आमदार राजेश पाडवी, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, माजी नगरसेवक के.डी. पाटील, दिनेश खंडेलवाल यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अचानक रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. या पाहणी दरम्यान रुग्णालयातील कर्मचारी संख्या कमी आढळल्याने तीव्र नाराजी व्यक्त करीत आमदार पाडवी यांनी शवविच्छेदन गृहाची ही पाहणी केली.शवविच्छेदन गृह नादुरुस्त असल्याने येथे शवविच्छेदन होत नसल्याचे कर्मचाºयांनी सांगितल्यानंतर त्यांनी पालिकेच्या आरोग्य सभापती वर्षा जोहरी यांना तात्काळ शवविच्छेदन गृहाच्या दुरुस्तीचे आदेश दिले. त्याच प्रमाणे जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क साधून या रुग्णालयात तात्काळ कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाºयांची व आवश्यक असलेल्या कर्मचाºयांची नेमणूक करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे आवश्यक असलेला औषधी साठा जिल्हा शल्यचिकित्सकांनी उपलब्ध करून देण्याचे सांगितलेया वेळी कर्मचाºयांनी अपूर्ण कर्मचारी संख्या असल्याने आहेत याच कर्मचाºयांवर कामाचा ताण पडत असल्याचे सांगितल्यानंतर याबाबत आपण तात्काळ वरिष्ठांशी भेटून कर्मचारी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले रुग्णालय परिसरात ठिकाणी दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य आढळल्याने त्यांनी कर्मचाºयांना धारेवर धरत रुग्णालय परिसर नेहमी स्वच्छ असावा याबाबत निर्देश दिले.
ग्रामीण रुग्णालयातील समस्येने आमदार संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 12:59 IST