नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथून अल्पवयीन युवतीस पळवून नेल्याप्रकरणी एकास अक्कलकुवा न्यायालयाने दंडाची शिक्षा सुनावली आहे़चांदपुर ता़ अक्कलकुवा येथील नरपतसिंग बाज्या वसावे यांच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फेब्रुवारी २०१७ मध्ये पंकज राजू वसावे रा़ चांदपूर याने खापर येथून पळवून नेल्याची घटना घडली होती़ याप्रकरणी नरपतसिंग वसावे यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता़ पोलीस हेड कॉन्स्टेबल जी़एफ़पावरा यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले केल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी करभजन यांच्या न्यायालयात खटला सुरु होता़ दरम्यान पंकज वसावे याच्याविरोधात आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यास न्यायालयाने १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ सरकारी वकील अजय सुरळकर यांनी सरकार पक्षातर्फे कामकाज पाहिले़ पैरवी अधिकारी म्हणून पोलीस नाईक सतीदान राऊळ यांनी काम पाहिले़
अल्पवयीन युवतीचे अपहरण करणाऱ्या आरोपीस दंडाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 11:24 IST