लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील खेडदिगर येथे 20 जून रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास मंडळ अधिकारी व तलाठी यांनी अवैध गौण खनिज वाहतूक करणारे दोन डंपर पकडले होते. परंतु अवघ्या दोन तासात हे डंपर सोडून देण्यात आल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.याबाबत वृत्त असे की, मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या खेडदिगर गावानजीक मंडळ अधिकारी निकिता नाईक व तलाठी योगिनी पाडवी ह्या खेडदिगरकडून शहादाकडे जात असताना कोचरा फाटय़ानजीक दोन डंपर (क्रमांक एम.एच. 18 एए-1247 व एम.एच.39 सी- 0664) आढळून आले. त्यांनी डंपर चालकांकडे तात्पुरता उत्खनन परवाना मागितला असता त्यांच्याकडे दुस:या डंपर क्रमांकांचा (एम.एच.04 -4170, एम.एच.15 एबी-4204 व एम.एच.15 एजी- 3853) परवाना होता. घटनास्थळी आढळून आलेल्या दोन्ही डंपरचा परवाना आढळून आला नाही. मंडळ अधिकारी नाईक व तलाठी पाडवी यांनी दोन्ही डंपर खेडदिगर ग्रामपंचायतीच्या आवारात उभे करून परिसरातील नागरिकांच्या साक्षीने पंचनामा केला. परंतु अवघ्या दोन तासात अवैध गौण खनिज वाहतूक करणारे हे डंपर सोडण्यात आले. अवघ्या दोन तासात कोणतीही कारवाई न होता दोन्ही डंपर सोडून देण्यात आले. एका परवान्यावर दुस:या क्रमांकाचे डंपर भरत असल्याने यातून शासनाचा महसूल बुडत आहे. गौण खनिजाचे अवैध उत्खनन व तस्करी, वाळूची अवैध वाहतूक मध्य प्रदेशच्या सीमेवरील खेडदिगर परिसरात सुरू आहे. हे प्रकार रोखण्याची जबाबदारी महसूल विभागावर असताना अधिका:यांचे मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने गौण खनिज व वाळूची अवैध वाहतुकीसह विक्री राजरोसपणे सुरू आहे. जर या दोन्ही डंपरवर मंडळ अधिकारी व तलाठी यांनी कारवाई केली असती तर निश्चितच लाखो रुपयांचा दंड डंपर मालकांना झाला असता व दंडाची रक्कम शासकीय महसूलात जमा झाली असती. मात्र कुठलीच कारवाई झाली नसल्याने लाखोंचे नुकसान झाले. याची वसुली आता कोण करणार? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.याबाबत मंडळ अधिकारी निकीती नाईक यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, पंचनामा केलेल्या डंपरचा रिपोर्ट शहादा तहसील कार्यालयात केल्याचे सांगितले.
गौण खनिजाचे डंपर दोन तासात सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 12:03 IST