लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वडगाव, ता.शहादा येथील अल्पवयीन मुलीवर गावातीलच एकाने अत्याचार केल्याची घटना घडली. मुलीच्या फिर्यादीवरून संशयीताविरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत फरार झाला आहे. अशोक अंबरसिंग पावरा (35) रा.वडगाव असे संशयीताचे नाव आहे. वडगाव येथे राहणारी अल्पवयीन मुलीला जबरीने धमकावून तिच्यावर अत्याचार केले. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. अत्याचार असह्य झाल्याने मुलीने घरातील लोकांना ही बाब सांगितली. त्यानंतर मुलीने शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून संशयीत आरोपी अशोक अंबरसिंग पावरा याच्याविरुद्ध बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक वाघ करीत आहे. संशयीत फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
अल्पवयीन बालिकेवर अत्याचार, एकाविरुद्ध पोस्कोचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 11:45 IST