MIM's flag at Akkalkuwa village | अक्कलकुवा ग्रा.पं.वर एमआयएम
अक्कलकुवा ग्रा.पं.वर एमआयएम

लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी एमआयएम पुरस्कृत उमेदवार राजेश्वरी इंद्रवदन वळवी यांचा विजय झाला़ त्यांनी भाजप पुरस्कृत उमेदवारी उषाबाई बोरा यांचा 610 मतांनी पराभाव केला़  
3 जूनपासून अक्कलकुवा ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी  पोटनिवडणूक कार्यक्रम  सुरु होता़ यांतर्गत रविवारी येथील 14 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली़ काहीशी संथ सुरुवात करत सायंकाळी साडेपाचर्पयत 10 हजार 185 मतदारांपैकी 5 हजार 876 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता़ सोमवारी सकाळी 10 वाजेपासून अक्कलकुवा तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली होती़ यात भाजप पुरस्कृत माजी सरपंच उषाबाई बोरा व एमआएमच्या राजेश्वरी वळवी ह्या दोघांमध्ये मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून चुरस दिसून आली़ अखेर 2 हजार 836 मते मिळाल्याने राजेश्वरी वळवी विजयी ठरल्या़ उषाबाई बोरा यांना 2 हजार 226 तर काँग्रेस पुरस्कृत सुशीलाबाई गेमू वळवी यांना 754 मते मिळाली़ या निवडणूकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होत़े एमआयएम कार्यकत्र्यानी राजेश्वरी वळवी यांच्या विजयानंतर एकच जल्लोष केला़ मतमोजणीत 57 मते ही नोटाला मिळाली़ 
ग्रामपंचायतीच्या पहिल्या लोकनियुक्त सरपंच उषाबाई बोरा यांचे पती प्रविण बोरा यांनी शासकीय जमिनीवर अतीक्रमण केल्याप्रकरणी न्यायालयात खटला सुरु होता़ उच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधात निकाल दिल्यानंतर उषाबाई बोरा यांना पदावरुन पायउतर व्हावे लागले होत़े यामुळे येथे लोकनियुक्त सरपंच पोट निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला़ तहसीलदार नितीनकुमार देवरे, निवासी नायब तहसीलदार विजय कछवे, निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम वाघ यांच्यासह तहसील कार्यालयातील कर्मचा:यांनी मतमोजणीचे कामकाज पाहिल़े तहसील कार्यालयात 4 फे:यांमध्ये 14 मतदान केंद्रांच्या ईव्हीएममधील मतांची मोजणी करण्यात आली़ अवघ्या दीड तासात निकालाची घोषणा करण्यात आली़ 
निकाल ऐकण्यासाठी शहरासह तालुक्यातील नागरिकांची तहसील कार्यालय परिसरात गर्दी झाली होती़ अक्कलकुवा ग्रामपंचायतीत एकूण 17 सदस्य आहेत़ उपसरपंच व एक सदस्य शिवसेनेचे  तर उर्वरित 15 सदस्य भारतीय जनता पक्षाचे आहेत़ लोकनियुक्त सरपंच हे एमआयएम पक्षाकडून निवडून गेल्याने ही निवडणूक त्रिशंकू झाल्याची स्थिती आह़े    
राजमोही ता़ अक्कलकुवा 
तालुक्यातील राजमोही ग्रुप ग्रामपंचायतीतील दोन जागासांठी पोटनिवडणुक झाली़ प्रभाग एक मधून मक्राणी आबेदाबी अब्दुल गफार तर प्रभाग तीन मधून मक्राणी रुखसारबानू कमरुद्दीन यांनी विजय मिळवला़  
उमर्दे खुर्द ता़ नंदुरबार
तालुक्यातील उमर्दे खुर्दे येथे प्रभाग एकमधील दोन जागांसाठी पोटनिवडणूक झाली़ रविवारी दोन्ही जागांसाठी 60.62 टक्के मतदान झाले. नंदुरबार तहसील कार्यालयात झालेल्या मतमोजणीत प्रतिभा श्रावण पाटील 86 तर कैलास रामा भिल 182 मतांनी विजयी झाल़े तालुक्यातील नळवे खुर्द, वेळावद आणि पावला या ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका जागेचा निकालही जाहिर करण्यात आला़ 
 


Web Title: MIM's flag at Akkalkuwa village
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.