शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कबूतर विक्रीतून होते लाखोंची उलाढाल

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: September 6, 2018 11:55 IST

‘वाईल्ड लाईफ’ येतेय धोक्यात : सूरतेत कबुतर विक्रीसाठी मोठी बाजारपेठ

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नैसर्गिक जीवन साखळीचे महत्वाचे आधार असलेल्या पशु-पक्षांच्या तस्करीचे नवे प्रकरण उजेडास आले आह़े सोमवारी मोठय़ा संख्येने अवैधरित्या कबुतरे घेऊन जाणा:या  5 संशयित आरोपींना नंदुरबार लोहमार्ग पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होत़े याबाबत अधिक चौकशी केली असता़ कबुतरांच्या खरेदी-विक्री व्यवहारातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे स्पष्ट झाले आह़े दरम्यान, कबुतरांसोबत अजून काही प्राण्यांची अशा प्रकारे तस्करी किंवा वाहतूक केली जातेय की काय? या दिशेनही वनविभागाकडून आता तपास केला जात आह़े कोलंबिया लिवीया जातीचे कबुतर हे शेडय़ुल्ड चारमध्ये मोडले जात आहेत़ त्यामुळे ही प्रजात संरक्षित नसली तरीदेखील तिला पाळणे किंवा नैसर्गिक अधिवारापासून दूर ठेवणे ‘वॉईल्ड लाईफ प्रोटेक्शन अॅक्ट’नुसार गुन्ह्यास पात्र असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात आले आह़े जिल्ह्यात ‘लव्ह बर्ड’ तसेच पक्षी खरेदी-विक्रीसाठी बाजारपेठ नाही़ परंतु सूरतमध्ये याची मोठी बाजापेठ आह़े त्यामुळे साहजिकच देशभरातून कबुतरांची तस्करी करुन ती सूरतेत विक्री करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली़ त्याच प्रमाणे कबुतरांचा वापर रेस्ट्रॉरंटमध्ये तसेच फार्म हाऊसमध्ये करण्यात येत असतो़ परंतु वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत ‘वाईल्ड प्रॉटेक्ट’ प्राण्यांना पाळणे गुन्ह्यास पात्र ठरु शकत़े त्याच प्रमाणे संशयितांकडून ज्या पध्दतीने कबुतरांची हाताळणी करण्यात आली, तोदेखील निर्दयीपणा असल्याचे सांगण्यात येत आह़े कबुतरांच्या तस्करीच्या कारणांबाबत सर्व शक्यता पडताळल्या असता, यास अंधश्रध्देची किनार असल्याचे दिसून येत आह़े कबुतराच्या तेलामुळे सांधे दुखीचे आजार बरे होतात, लिव्हरसंबंधि आजार बरा करण्यासाठी कबुतराचे लिव्हर खांल्यास फायदा होतो, त्याच प्रमाणे अघोरी विद्येचा वापर करण्यासाठीही कबुतराचा मोठय़ा प्रमाणात वापर होत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली़ सूरतेत कबुतरांची मोठी बाजारपेठ असल्याने संपूर्ण देशात कबुतरांची तस्करी करणारी टोळीच सक्रीय असल्याचा संशय आता व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान, सोमवारी ताप्तीगंगा एक्सप्रेसमधून लखनौ येथून सुरतेला कबुतरांची वाहतूक करणा:या संशयित आरोपी मोहम्मद फजल अन्सारी (60), मोहम्मद  इरफान (45), मोहम्मद सईद कुरेशी (40), मोहम्मद रफीक अहमद मन्सूरी (35), फरकान शेख (25) यांना बुधवारी नंदुरबार येथील न्यायदंडाधिकारी श्रेणी 1 यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होत़े या वेळी आरोपींचे म्हणणे एकत न्यायालयाने त्यांना 14 सप्टेंबर्पयत न्यायालयीन कोठडी सुनावली आह़े दरम्यान, संबंधित कबुतरांबाबत मात्र न्यायालयाने अद्याप कुठलाही निर्णय दिलेला नाही़ कबुतरांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यावे अशी मागणी वनविभागाकडून करण्यात आली होती़ परंतु वनविभागाचे म्हणणे न्यायालयाकडून फेटाळण्यात आले होत़े त्यामुळे न्यायालयाच्या पुढील निर्णयार्पयत वनविभागाला संबंधित कबुतरांची सोय करावी लागणार आह़े न्यायालयाने संशयित आरोपींचे म्हणणे जाणून घेतले असता, कबुतर पाळण्यासाठी घेऊन जात असल्याची ‘री’ बुधवारीही ओढण्यात आली़ परंतु वाईल्ड अॅक्टनुसार पक्षी पाळणेही कायद्यात बसत नसल्याचे जाणकारांनी सांगितल़े