शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना बसणार कोट्यवधींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 13:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे जनजीवन हवालदिल झाले असतानाच वेधशाळेने अवकाळी पावसाचा इशारा दिल्यानंतर परिसरातील हजारो ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे जनजीवन हवालदिल झाले असतानाच वेधशाळेने अवकाळी पावसाचा इशारा दिल्यानंतर परिसरातील हजारो शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतात पीक तयार आहे, व्यापारी माल खरेदी करायला तयार आहेत मात्र पीक कापणीसाठी मजुरांना ग्रामस्थ गावात येऊ देत नाही व पीक कापणीनंतर वाहतुकीला जिल्हाबंदी व आंतरराज्यबंदी असल्याने आसमानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता मदतीसाठी केंद्र शासनाने विशेष धोरण जाहीर केले पाहिजे, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.सर्वाधिक सधन शेतीबाबत संपूर्ण खान्देशात शहादा तालुका प्रख्यात आहे. येथे पिकणारी केळी व पपई या पिकाच्या निर्यातीमुळे केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही शहाद्याची स्वतंत्र ओळख आहे. मात्र कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत राज्यात संचारबंदी व १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन परिस्थिती जाहीर केल्याने याचा सर्वाधिक फटका शेतकºयांना सोसावा लागणार आहे. परिसरात केळी व पपई नाशवंत फळपिके कापणी व निर्यातीसाठी योग्य असताना केवळ त्याची कापणी होत नसल्याने शेतातच उभी आहेत. अनेक केळीचे घड झाडावरून खाली जमिनीवर पडले आहेत तर पपईसुद्धा झाडावरच पिकू लागली असून पिवळी होत आहे. परिणामी अशीच परिस्थिती कायम राहिली तर शेतकºयांना कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.पपईच्या दराबाबत शेतकरी व व्यापारी संघर्षामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पपईही तोड बंद होती. अशा परिस्थितीत केंद्र शासनाच्या निर्णयामुळे वाहतूकदारांना वाहतूक पुरवठा करण्यात अडचणी निर्माण होत आहे. व्यापारी आता शेतकºयांचा माल खरेदी करायला तयार आहेत मात्र वाहतुकीसाठी वाहने उपलब्ध असली तरी पपई व केळी ही पंजाब, हरियाणा, दिल्ली या राज्यांसह केळीची निर्यात आखाती देशात परदेशात होत असल्याने केवळ जिल्हा व आंतरराज्यबंदीमुळे शेतकºयांसह व्यापारी हवालदिल झाले आहेत. त्यातच अनेक गावकºयांनी आपल्या गावात परगावच्या नागरिकांना येण्यास व वास्तव्यास मनाई केल्याने व्यापाºयांकडे मजुरांची उपलब्धता आहे. मात्र या मजुरांना गावात येण्यास गावकºयांनी मनाई केली असल्याने व्यापारीही हतबल झाले आहेत.याव्यतिरिक्त तालुक्यात गहू, हरभरा, कांदा, ज्वारी या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. संचारबंदी जारी होण्यापूर्वी अनेक शेतकºयांनी त्यांच्या शेतातील पिकाची मळणी करून उत्पादन हे घरी अथवा खळ्यांमध्ये जमा करून ठेवले आहे. त्याचप्रमाणे अनेक शेतकºयांचे पीक शेतात तयार आहे. मात्र संचारबंदीच्या आदेशामुळे मजुरांची उपलब्धता होत नसल्याने शेतातच पीक आता करपायला लागले आहे. त्यातच ३१ मार्चपर्यंत शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसह मध्य प्रदेशातील खेतिया बाजार समितीचे सर्व व्यवहार ठप्प झाले असल्याने घरी शेतमाल आहे मात्र त्याची विक्री शेतकरी बाजार समितीत करू शकत काही. अशी परिस्थिती असताना वेधशाळेने व हवामान खात्याने खान्देशात अवकाळी पावसाचा इशारा दिला असल्याने परिसरातील शेतकरी आसमानी व मानवनिर्मित सुलतानी संकटात सापडला आहे. शेतकºयाला वाचविण्यासाठी केंद्र शासनाने आता योग्य नियोजन व धोरण ठरवून शेतमाल विक्रीसाठी उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहेशहादा परिसरातील हजारो शेतकºयांच्या शेती उत्पादनाची कापणी व विक्री झाली नाही तर शेतकºयांना कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. यासाठी जिल्हाधिकाºयांनी आंतरराज्य वाहतूक व्यवस्था सुरू करण्यासाठी शेतकºयांच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करून पाठपुरावा करावा. अशा आशयाच्या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडे दिले आहे.