शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

म्हसावद ग्रा़पंसाठी 26 रोजी होणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 12:09 IST

ग्रामपंचायत निवडणूक : सरपंच पदासाठी 23 तर सदस्यपदासाठी 163 अर्ज दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार/नवापूर/अक्कलकुवा : म्हसावद ता़ शहादा येथील सहा प्रभागांतील 17 जागा आणि एक लोकनियुक्त सरपंच पदासाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत आयोगाने काहीअंशी बदल केला आह़े यापूर्वी ग्रामपंचायतीसाठी होणारे 23 रोजी होणारे मतदान आता 26 सप्टेंबर रोजी होणार आह़े दोन वाढवून मिळाल्याने प्रचार करणा:या उमेदवारांमध्ये उत्साह दुणावला आह़े  निवडणूक आयोगाने म्हसावद ता़ शहादा येथे 26 सप्टेंबर तर जिल्ह्यात इतर 51 ग्रामपंचायतींसाठी सात ऑक्टोबर रोजी होणा:या मतदानावेळी शासकीय सुटी जाहिर केली आह़े ही सुटी त्या क्षेत्रातील मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी देण्यात आली आह़े नंदुरबार तालुक्यात 16, नवापूर 12, शहादा 7, अक्कलकुवा 15 आणि तळोदा तालुक्यात एका ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात ही सुटी देण्यात आली आह़े  निवडणूक प्रक्रियेत बुधवारी दिवसभरात नंदुरबार जिल्ह्यातील 51 ग्रामपंचायतींच्या 185 प्रभागातील 504 सदस्यपदांसाठी 133 अर्ज तर सरपंच पदासाठी 23 अर्ज दाखल करण्यात आले आहेत़ सदस्य पदासाठी आतार्पयत 163 अर्ज दाखल आहेत़ बुधवारी अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार आणि नवापूर तहसील कार्यालयातील निवडणूक कक्षात दाखल झालेल्या इच्छुकांनी अर्ज दाखल केल़े विशेष म्हणजे सरपंच पदासाठी अर्ज दाखल झाल्याने नामनिर्देशनाची कोंडी फुटल्याचे बोलले जात आह़े आतार्पयत सर्वाधिक अर्ज हे नवापूर तालुक्यात आले आहेत़ तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींसाठी आतार्पयत तब्बल 73 नामनिर्देशन दाखल झाले आहेत़ यात सात नामनिर्देशन हे लोकनियुक्त सरपंच पदासाठी आहेत़ गुरूवारी सुटी असल्याकारणाने बहुतांश उमेदवारांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती देण्यात आली आह़े यातही साधारण 200 च्यावर इच्छुकांचे नामनिर्देशन आयोगाच्या संकेतस्थळावर भरून तयार आहेत़