कार्यक्रमात रोटरी गुणवंत संस्थाचालक गौरव पुरस्कार प्रा. मकरंद नगीन पाटील व पुष्पेंद्र गोवर्धन रघुवंशी यांना प्रदान करण्यात आला. या वेळी गुणवंत कर्तव्यदक्ष अधिकारी गौरव पुरस्कार शेखर रौंदळ, मच्छिंद्र कदम, डॉ. राहुल चौधरी, भानुदास रोकडे यांना प्रदान करण्यात आला. गुणवंत प्राध्यापक गौरव पुरस्कार प्रा.डॉ.माधव कदम, प्रा. बुलाखी बागुल तसेच गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार अनिल बाबूराव वायकर, कालिदास गोपालकृष्ण पाठक, हेमंत पुरुषोत्तम पाटील, आसिफ इक्बाल आहद, शेख अकिल शेख अहमद, शशिकांत पांडुरंग पाटील, करण उखाजी चव्हाण, सपना सयाजीराव हिरे, पी. जी. पाटील, रोहिदास वाघ यांना प्रदान करण्यात आला. गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी गौरव पुरस्कार जयेश लक्ष्मणभाई वाणी यांनादेण्यात आला. यशस्वीतेसाठी रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष मनोज गायकवाड, सचिव अनिल शर्मा, रमाकांत पाटील, डॉ.विशाल चौधरी, शितल पटेल, जितेंद्र सोनार, निलेश तवर, शब्बीरभाई मेमन, फकरुद्दीन जलगुनवाला, फय्याज खान, राकेश आव्हाड, प्रोजेक्ट चेअरमन डी. डी. साळुंके, लिटरसी चेअरमन इसरार सय्यद, अजय माळी, पुष्कर सूर्यवंशी, अनिकेत अग्रवाल, इकबाल सर, राहुल पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार किरण दाभाडे यांनी केले.
रोटरी नंदनगरीतर्फे गुणवंतांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:37 IST