शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

सीईओंचा निषेध करीत दोघांचा सभात्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 11:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत कुठलाही निर्णय घेण्यात आला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. दरम्यान, उपाध्यक्षांच्या दालनाची भिंत तोडल्याच्या मुद्दयावर मुख्य कार्यकारी अधिकारी आजच्या सभेत उत्तर देणार होते. परंतु ते अनुपस्थित राहिल्याने भाजपच्या दोन सदस्यांनी सीईओ हाय...हाय... च्या घोषणा देत सभागृहाबाहेर पडणे पसंत केले.जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी अध्यक्षा सिमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपाध्यक्ष राम रघुवंशी, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ उपस्थित होते. पहिलीच सर्वसाधारण सभा असल्यामुळे विविध विषयांवर चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता होती. परंतु बुधवारी सायंकाळी विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने बैठकीत कुठलाही धोरणात्मक निर्णय घेतला गेला नाही. परंतु अपेक्षेप्रमाणे भिंतीचा मुद्दा उपस्थित करून भाजपच्या सदस्यांनी अध्यक्षांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.सभेचे कामकाज सुरू होताच भाजपच्या सदस्या व या प्रकरणी तक्रार दाखल केलेल्या अर्चना गावीत व राजश्री गावीत यांनी उपाध्यक्षांच्या दालनाची भिंत पाडल्याचा मुद्दा उपस्थित केला. आजच्या सभेत सीईओ विनय गौडा यांनी याबाबत सविस्तर माहिती व चौकशी अहवाल सादर करणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु स्वत: सीईओच गैरहजर असल्यामुळे संतप्त झालेल्या गावीत भगिनींनी हा मुद्दा आधी चर्चेत घ्यावा अशी मागणी केली. परंतु अध्यक्षा सिमा वळवी यांनी नियमाप्रमाणे आणि विषय सुचीप्रमाणे सभेचे कामकाज होईल.बांधकाम विभागाचा विषय आल्यावर आपण प्रश्न उपस्थित करावा असे सांगितले. परंतु अर्चना व राजश्री गावीत या ऐकण्यास तयार नव्हत्या. सीईओंनी उपस्थित व्हावे व माहिती द्यावी अशी मागणी केली. तरीही सभेचे कामकाज नियमाप्रमाणे सुरूच राहिल्याने संतापलेल्या अर्चना गावीत यांनी सीईओ हाय हाय च्या घोषणा देत सभागृहाबाहेर जाणे पसंत केले. त्यांच्या मागे राजेश्री गावीत देखील निघाल्या.त्यानंतर सभेचे कामकाज सुरळीत झाले. यावेळी भरत गावीत, सुहास नाईक, रवींद्र पाडवी, अजीत नाईक, राया मावची, भूषण कामे यांनी प्रश्न उपस्थित केले.निरंतर शिक्षणाधिकारी गायबनिरंतर शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी कधीही जिल्ह्यात येत नाही, बैठकांना उपस्थित राहत नाहीत याबाबत सुहास नाईक यांनी प्रश्न उपस्थित केला. शिक्षणाधिकारी रोकडे यांनी हे पद नंदुरबार व धुळे संयुक्त आहे. त्यांना बैठकांबाबत कळविण्यात येते, परंतु ते येत नसल्याचे सांगितले. त्यावर अध्यक्षांनी संबधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सुचना दिल्या.प्रशिक्षण पथकावर कब्जाआरोग्य विभागाच्या जिल्हा प्रशिक्षण पथकावर गेल्या नऊ वर्षांपासून एकाच अधिकाºयाचा कब्जा आहे. त्यांची वैद्यकीय पात्रता नसतांना व त्यांची नियुक्ती नसतांना त्यांना तेथे पदभार देण्यात आला आहे. वास्तविक तीन वर्षांपूर्वी डॉ.संजय वळवी यांना नियुक्ती दिली असतांना त्यांना पदभार दिला जात नाही. याची चौकशी करण्याची मागणी यावेळी भरत गावीत, अजीत नाईक यांनी केली. त्यावर योग्य तो निर्णय घेण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना अध्यक्षांनी सुचविले.इतर होळींनाही निधी द्याकाठीच्या राजवाडी होळीप्रमाणेच सातपुड्यातील इतर गावांना होणाºया होळींचा मान देखील मोठा आहे. त्यामुळे काठीच्या होळीला जसा निधी दिला जातो तसा इतर होळींनाही दिला जावा अशी मागणी करण्यात आली. परंतु सध्या आचारसंहिता असल्यामुळे तसा निर्णय घेता येणार नाही, पुढील बैठकीत याबाबत निर्णय घ्यावा अशी अपेक्षा पराडके यांनी व्यक्त केली. अनेक सदस्यांनी त्यांच्या या मागणीला पाठींबा दिला.बैठकीला सभापती अभिजीत पाटील, रतन पाडवी, निर्मला राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुपेंद्र बेडसे यांच्यासह सदस्य व विभागप्रमुख उपस्थित होते.

सभेचे कामकाज कसे चालवावे, कुठले मुद्दे कधी उपस्थित करावे, योजनांचा निधी कसा आणि कुठे खर्च करावा, जिल्हा परिषदेचे अधिकार काय? यासह इतर माहिती व्हावी यासाठी निवडून आलेल्या सर्वच ५६ सदस्यांना प्रशिक्षणाची नितांत गरज असल्याचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य भरत माणिकराव गावीत यांनी सांगितले. सभेनंतर पत्रकारांशी बोलतांना भरत गावीत यांनी खंत व्यक्त केली. अनेक सदस्य नवीन आहेत. त्यांना माहिती व्हावी यासाठी यशदाने स्थानिक ठिकाणीच प्रशिक्षण घ्यावे म्हणजे सभा चालवितांना व एकुणच जिल्हा परिषदेत कामकाज करतांना गैरसमज होणार नाहीत आणि अडचणी येणार नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेत सर्वच पक्षाचे सदस्य सत्ताधारी आहेत. त्यामुळे सर्वांनी मिळून, मिसळून व सामंजस्याने सभागृह चालवावे असे आवाहन बांधकाम सभापती अभिजीत पाटील यांनी सभागृहात केले. विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे, वैचारिक मतभेद ठेवा, पण मनभेद नको असेही ते म्हणाले.