मोड येथे नाबार्डतर्फे मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 12:42 PM2020-11-09T12:42:22+5:302020-11-09T12:42:29+5:30

n  लोकमत न्यूज नेटवर्क बोरद :   तळोदा तालुक्यातील मोड येथे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) तर्फे ...

Meet by NABARD at Mode | मोड येथे नाबार्डतर्फे मेळावा

मोड येथे नाबार्डतर्फे मेळावा

Next

n  लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद :   तळोदा तालुक्यातील मोड येथे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) तर्फे स्वच्छ, निरोगी सुखी गाव कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ग्रामस्थांची सभा घेण्यात येऊन मास्क व शाैचालय बांधणे यावर चर्चा करण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी होत्या.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सरपंच जयसिंग माळी, गुलाबसिंग गिरासे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रबंधक प्रमोद पाटील, प्रकल्प व्यवस्थापक लक्ष्मण खोसे, व्यवस्थापक ए.टी.शेख , ग्रामीण बँकेच्या मोड शाखेचे व्यवस्थापक प्रितेश बागले, जिल्हा बँकेच्या मोड बोरद शाखेचे व्यवस्थापक पी.आर.वसावे, बँक निरीक्षक एम.एन.मावची, वाय.एम.वसावे, ग्रामविकास अधिकारी शांतीलाल बावा आदी उपस्थित होते. लुपीन फाउंडेशनच्या सहकार्याने हा उपक्रम घेण्यात आला. तानाजी मगरे यांनी या अभियानाचे महत्त्व स्पष्ट केले. प्रितेश बागले यांनी महिला बचत गटांना दिलेले आर्थिक सहाय्य व त्यांनी केलेली परतफेड यांची माहिती दिली. बँकांच्या अधिका-यांनी या मेळाव्यात बँकींग योजनांसह ग्रामीण भागातील उपाययोजनांची माहिती दिली. 
ॲड. सीमा वळवी यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगून महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक विकास करून घेतला पाहिजे, बचत गटातून झालेला विकास हा मुलांच्या शैक्षिणक प्रगतीला वेग देणारा आहे. यामुळे महिलांनी स्वत:चा आर्थिक विकास साधून बचत गटांची चळवळ अधिक मजबूत करावी असे सांगितले. कार्यक्रमात अंमलपाडा येथील सोेंगाड्या पार्टींच्या कलावंतांकडून पथनाट्याचे महत्त्व सांगून जनजागृती करण्यात आली.

Web Title: Meet by NABARD at Mode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.