उत्पादनवाढीने भाजीपाला स्वस्त
नंदुरबार : तालुक्यातील विविध भागांत यंदा पाणकोबी व शिमला मिरचीचे उत्पन्न चांगले आहे. हा माल शेतकरी बाजारपेठेऐवजी थेट रस्त्यावर जाऊन विकत आहेत. यातून नंदुरबार ते प्रकाशा, नंदुरबार ते रनाळे, विसरवाडी ते नंदुरबार मार्गावर भाजीपाला विक्री करणारे शेतकरी दिसून येत आहेत. यातून बाजारपेठेपेक्षा अधिक उत्पन्न मिळत असल्याने बहुतांश शेतकरी विक्री करत आहेत.
वेगवान डंपरमुळे नागरिक त्रस्त
नंदुरबार : शहरातील तळोदा रोड मार्गाने धुळे चाैफुलीकडे दर दिवशी भरधाव वेगात धावणारे डंपर नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. वाळू भरलेले तसेच रिकामे ढंपर तीव्र वेगाने इतर वाहनांना कट मारून जात असल्याचे सातत्याने समोर येत आहे.