लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील माहेर व दहिसर जि़ठाणे येथील सासर असलेल्या विवाहितेचा 50 लाख रुपयांसाठी छळ करण्यात आला़ विवाहितेने प्लॉट घेण्यासाठी 50 लाख आणावेत म्हणून बाबुलाल दरबार राठोड, दरबार जोहरसिंग राठोड, सुशिलाबाई दरबार राठोड, मोतीलाल राठोड व विलास राठोड सर्व रा़ दहिसर यांनी शारिरिक व मानसिक छळ केला होता़ मार्च 2019 र्पयत हा प्रकार सुरु होता़ पाचही जणांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चौरे करत आहेत़
50 लाखासाठी विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 12:06 IST