तळोद्यात आजही बाजारपेठ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 11:29 AM2020-06-04T11:29:36+5:302020-06-04T11:29:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा/कोठार : निसर्ग चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर तळोदा शहर बुधवार दुपारी तीन वाजेपासून गुरूवारी दिवसभर बंद ठेवण्याचा ...

The market in Talodya is still closed today | तळोद्यात आजही बाजारपेठ बंद

तळोद्यात आजही बाजारपेठ बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा/कोठार : निसर्ग चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर तळोदा शहर बुधवार दुपारी तीन वाजेपासून गुरूवारी दिवसभर बंद ठेवण्याचा निर्णय बुधवारी तळोदा येथील उपविभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
निर्सग चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची तत्काळ बैठक घेण्यात आली होती. बैठकीस उपविभागीय अधिकारी अविशांत पांडा, मुख्याधिकारी सपना वसावा, नगराध्यक्ष अजय परदेशी, तहसीलदार पंकज लोखंडे, पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे, बांधकाम विभागाचे उपअभियंता पी.जे. वळवी, विद्युत वितरण अभियंता सचिन काळे, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, सहाय्यक गटविकास अधिकारी आर.बी. सोनवणे, नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
या बैठकीत बुधवारी दुपारी तीन वाजेपासून ते गुरूवारी संपूर्ण दिवस बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने पालिकेच्या माध्यमातून उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय पालिकेने नदी काठच्या लोकांना सतर्क करून नाला खोलीकरण व गटारींमधील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर राबवावे. तसेच कच्च्या घरातील लोकांना जिल्हा परिषद शाळा, समाज मंदिरे येथे शिफ्ट करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पाण्याच्या निचऱ्यात अडथळा ठरणारे मार्ग मोकळे करावे, आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या.

उपविभागीय कार्यालयात नियंत्रण कक्ष साकारण्यात आला आहे.या नियंत्रण कक्षातून गाव पातळीवर तलाठी व ग्रामसेवकांशी चोवीस तास संपर्क राहणार आहे. ग्रामसेवक व तलाठी यांना मुख्यालय न सोडण्याच्या इशारा देण्यात आला आहे.

Web Title: The market in Talodya is still closed today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.