शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘कॅपीटल टॅक्स’नी बाजार गडगडला. : नंदुरबारातील शेअर बाजाराची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : केंद्र शासनाने शेअर मार्केटवर नव्याने 10 टक्के ‘कॅपीटल टॅक्स’ लावला आह़े त्यामुळे याचा परिणाम म्हणून शेअर बाजार गडगडला आह़े गुंतवणूकदारही आता शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास धजावत नसल्याचे मत जिल्ह्यातील शेअर बाजारातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आह़े  केंद्र शासनाने नुकतेच आपल्या सरकारच्या पाच वर्षाच्या कार्यकाळातील अंतीम अर्थसंकल्प ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : केंद्र शासनाने शेअर मार्केटवर नव्याने 10 टक्के ‘कॅपीटल टॅक्स’ लावला आह़े त्यामुळे याचा परिणाम म्हणून शेअर बाजार गडगडला आह़े गुंतवणूकदारही आता शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास धजावत नसल्याचे मत जिल्ह्यातील शेअर बाजारातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आह़े  केंद्र शासनाने नुकतेच आपल्या सरकारच्या पाच वर्षाच्या कार्यकाळातील अंतीम अर्थसंकल्प सादर केला आह़े शेवटचा अर्थसंकल्प असल्याने या व्यापारी, मध्यवर्गीयांसाठी काही तरी ‘खास’ असेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती़ परंतु या अर्थसंकल्पामुळे मध्यवर्गीय व शेअर बाजाराची तरी सध्या निराशाच झालेली दिसून येत आह़े या अर्थसंकल्पात शेअर मार्केटवर 10 टक्के ‘कॅपीटल टॅक्स’ व  ‘सिक्युरीटी ट्रान्ङॉक्शन टॅक्स’ लावण्यात आला आह़े त्यामुळे शेअर बाजारदेखील 1 हजार पॉईंटने                खाली आल्याचे दिसून येत                   आह़े त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणा:यांमध्ये चांगलीच धडकी भरली गेली असल्याचे जाणकारांकडून आता सांगण्यात येत आह़े शासनाने हा टॅक्स रद्द केला नाही तर किमान कमी करावा अशी अपेक्षा आता गुंतवणूकदारांकडून व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान, अर्थसंकल्प सादर होत असतानादेखील देशभरात शेअर बाजार पूर्णपणे खाली कोसळला होता़ शेअर बाजारावर टॅक्स लावताच बहुसंख्य गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून काढता पाय घेतला असल्याचे दिसून येत होत़े इतर व्यवसाय घेणार वेग.दरम्यान शेअर बाजारावर टॅक्स लावण्यात आल्याने गुंतवणूकदार कमालीचे नाराज आहेत़ त्यामुळे  याचा फटका शेअर बाजाराला               बसत असल्याचे दिसून येत आह़े शिवाय यामुळे सध्या कोमात गेलेले मालमत्ता खरेदी- विक्री व्यवहारांना संजीवनी  मिळणार असल्याचे दिसून येत आह़े त्याच प्रकारे सुवर्णबाजारही यामुळे चांगलीच पकड बसवेल अशी माहिती जाणकारांकडून देण्यात येत आह़े शेअर बाजारात पुन्हा तेजी आणायची असल्यास कॅपीटल टॅक्स काही अंशी कमी करणे गरजेचे आह़े अथवा शेअर बाजारात कमालीची घसरण होणार असल्याचे सांगण्यात येत आह़े