कोरोनाच्या सात सरकारी रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:27 AM2021-04-19T04:27:12+5:302021-04-19T04:27:12+5:30

नंदुरबार : जिल्ह्यात चार सरकारी व १९ खासगी कोरोना उपचार रुग्णालयांतील डॅाक्टर व कर्मचाऱ्यांची मोठी कसरत होत आहे. १२ ...

Manpower drills at seven government hospitals in Corona | कोरोनाच्या सात सरकारी रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाची कसरत

कोरोनाच्या सात सरकारी रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाची कसरत

googlenewsNext

नंदुरबार : जिल्ह्यात चार सरकारी व १९ खासगी कोरोना उपचार रुग्णालयांतील डॅाक्टर व कर्मचाऱ्यांची मोठी कसरत होत आहे. १२ ते १४ तास ड्यूटी करावी लागत असल्याचे चित्र आहे. अपुऱ्या मनुष्यबळाअभावी प्रशासनही हवालदिल झाले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. दररोज ६०० ते ९०० रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे सरकारी व खासगी कोरोना उपचार रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयासह शहादा, नवापूर व तळोदा येथे शासकीय रुग्णालये सुरू आहेत. तर जिल्हाभर मिळून एकूण १९ खासगी रुग्णालये सुरू आहेत. याशिवाय सात ठिकाणी सरकारी कोविड केअर सेंटर्स सुरू आहेत. रेल्वेच्या कोविड केअर सेंटरमुळे आणखी दिलासा मिळाला आहे. सरकारी रुग्णालये आणि कोविड सेंटरमध्ये मनुष्यबळ पुरविण्यासाठी कसरत होत आहे. डॉक्टरांची कमतरता, नर्सेस व वॉर्डबॅाय यांची अपुरी संख्या यामुळे तारांबळ उडत आहे. १२ ते १४ तास ड्युटी करावी लागत आहे. लवकरच जिल्ह्यात सात ग्रामीण रुग्णालयांमध्ये कोविड केअर सेंटर सुरू होत आहे तर जिल्हा परिषदेतर्फे जवळपास ६० मोठ्या गावांमध्ये शाळा, सामाजिक सभागृहांमध्ये अलगीकरण कक्ष सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

Web Title: Manpower drills at seven government hospitals in Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.