शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

माणिकराव गावीत यांच्या पुत्राची बंडखोरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:25 IST

माणिकराव गावितांची भेट न घेतल्याने नाराजी

नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी करण्यास इच्छुक असलेले भरत माणिकराव गावीत बंडखोरीच्या तयारीत आहेत़ कार्यकर्त्यांचा दबाव पाहता त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात येत आहे़नंदुरबारच्या जागेसाठी काँग्रेस पक्षाकडून आमदार अ‍ॅड़ के़सी़पाडवी व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत माणिकराव गावीत हे इच्छुक होते़ परंतू पक्षाने आमदार अ‍ॅड़ के़सी़पाडवी यांना तिकिट दिले़ मात्र लोकसभा मतदारसंघ ज्यांच्या नावाने ओळखला गेला ते माजी केंद्रीयमंत्री माणिकराव गावीत यांचा जनसंपर्क, आणि सर्वांना सोबत घेत काम करण्याची पद्धत यामुळे तळागाळातील कार्यकर्ते त्यांचे पुत्र भरत गावीत यांच्या उमेदवारीसाठी ंआग्रही होते़ आमदार अ‍ॅड़पाडवी यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यानंतरही भरत गावीत यांना उमेदवारी करण्याबाबत कार्यकर्ते गळ घालत होते़ यामुळे त्यांच्याकडून उमेदवारी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असल्याची माहिती असून ३० रोजी तशी घोषणा ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करणार असल्याचे सांगण्यात आले आहे़माणिकराव गावितांची भेट न घेतल्याने नाराजीआमदार अ‍ॅड़ के़सी़पाडवी यांना काँग्रेसने उमेदवारी जाहिर केल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी नवापूर येथे गेले होते़ याठिकाणी त्यांनी माजीमंत्री आमदार सुरुपसिंग नाईक यांची भेट घेतली होती़ याच शहरात सलग ९ वेळा लोकसभा निवडणूक लढवून विजय मिळवणाऱ्या माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत हेही राहतात परंतू आमदार पाडवी यांनी त्यांची भेट न घेतल्याने माणिकराव गावीत परिवाराने नाराजी व्यक्त केली होती़ या नाराजीतूनच भरत गावीत हे अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले आहे़ भरत गावीत हे नवापूर तालुका काँग्रेस कमिटीचेही अध्यक्ष आहेत़

टॅग्स :Politicsराजकारणnandurbar-pcनंदुरबार