शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

मांडवा आश्रमशाळा स्थलांतराला विरोध

By admin | Updated: January 4, 2017 23:50 IST

मोलगी : अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या मांडवा येथील अनुदानित आश्रमशाळेचे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे़

मोलगी : अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या मांडवा येथील अनुदानित आश्रमशाळेचे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे़ या प्रस्तावाला ग्रामस्थांनी ठरावाद्वारे विरोध केला आहे़ या आश्रमशाळेचे स्थलांतर थांबवण्याच्या मागणीचा ठराव करून तो जिल्हाधिकाºयांना देण्यात आला आहे़   नर्मदा काठावरील गावांमधील विद्यार्थ्यांच्या सोयीची ही आश्रमशाळा याच ठिकाणी राहू द्यावी असा ग्रामस्थांचा आग्रह असला तरी, आदिवासी विकास विभागाने याकडे दुर्लक्ष करून स्थलांतराची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती देण्यात आली आहे़ अति दुर्गम भागात असलेल्या या आश्रमशाळेमुळे या भागात असलेली निरक्षरता दूर होऊन साक्षरतेचे प्रमाण वाढले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे़ यामुळे ही शाळा याच ठिकाणी ठेवण्यासाठी ग्रामस्थांकडून पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे़ याठिकाणी नवीन इमारत बांधून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी दिलेल्या ठरावात व्यक्त केली आहे़ (वार्ताहर)

शासनही स्थलांतराबाबत विचार करणार ग्रामस्थांनी याबाबत केलेले ठरावाच्या प्रती जिल्हाधिकारी डॉ़ एम़ कलशेट्टी, प्रकल्प अधिकारी यांच्याकडे दिल्या आहेत़ या ठरावात म्हटल्याप्रमाणे मांडवा येथेच संबंधित संस्थेला अनुदान देऊन आश्रमशाळेची इमारत उभारण्यात यावी़ या इमारतीसाठी मांडवा ग्रामपंचायतीचे सरपंच भावसिंग फुलसिंग वळवी यांनी जागा देण्याची तयारी दर्शवली आहे़ याबाबत ग्रामपंचायतीने संबंधित संस्थेला वारंवार पत्र देऊनही कारवाई करण्यात आलेली नाही़ मांडवा ग्रामपंचायत हद्दीतील ४०० पालकांनी या ठरावावर स्वाक्षºया केल्याची माहिती देण्यात आली आहे़ अति दुर्गम भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाºया आश्रमशाळेचे स्थलांतर थांबवण्याबाबत ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांकडून लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आहे़ याबाबत ‘लोकमत’ने प्रकल्पाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासोबत संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीचा या आश्रमशाळेच्या स्थलांतराला विरोध असेल तर, प्रस्तावाचा शासन विचार करेल, शाळा स्थलांतर करण्यासाठी दोन्ही ग्रामपंचायतीची समंती आवश्यक असते़ त्याशिवाय स्थलांतर हे होऊ शकत नाही़ 

१९८८ पासून सुरुवात आदिवासी विकास विभाग आणि तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ धडगावकडून १९८८ साली या आश्रमशाळेची उभारणी करण्यात आली होती़ नर्मदा नदी काठावर असलेल्या या आश्रमशाळेला पक्की इमारत नसल्याने ही शाळा कुडाच्या घरात चालवली जात होती़ यात पहिली ते १० वीच्या वर्गातील सुमारे एक हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ या विद्यार्थ्यांचे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव देण्यात आल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ विरोध करत स्थलांतराचा प्रस्ताव संबधित संस्थेने मागे घ्यावा यासाठी पदाधिकाºयांसोबत संपर्क केला होता़ अक्कलकुवा शहरपासून काही अंतरावर या आश्रमशाळेचे स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती आहे़ या आश्रमशाळेचे स्थलांतर झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे़ नर्मदा काठावर असलेल्या गाव आणि पाड्यांवरील विद्यार्थी या ठिकाणी प्रवेशित आहेत़ पहिली ते १० वीच्या वर्गात साधारण ७०० तर कनिष्ठ महाविद्यालयात ३०० विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती आहे़