शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात बिबटय़ाच्या कातडीसह ‘मांडूळ’ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वनविभागाच्या पथकाने नंदुरबार-प्रकाशादरम्यान सापळा रचून तिघांना अटक करत, त्यांच्याकडून बिबटय़ाची कातडी आणि मांडूळ जातीचा साप ताब्यात घेतला.  पथकाने ताब्यात घेतलेले तिघे संशयित जामदे, ता़ साक्री येथील आहेत. ते कातडी आणि मांडूळ मध्य प्रदेशात घेऊन जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. गुरुवार, 15 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास झालेल्या या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वनविभागाच्या पथकाने नंदुरबार-प्रकाशादरम्यान सापळा रचून तिघांना अटक करत, त्यांच्याकडून बिबटय़ाची कातडी आणि मांडूळ जातीचा साप ताब्यात घेतला.  पथकाने ताब्यात घेतलेले तिघे संशयित जामदे, ता़ साक्री येथील आहेत. ते कातडी आणि मांडूळ मध्य प्रदेशात घेऊन जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. गुरुवार, 15 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास झालेल्या या कारवाईनंतर तिघा तस्करांना नंदुरबार सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होत़े वनविभागाच्या पथकाला चार दिवसांपूर्वी तिघांकडून वाघाची कातडी आणि मांडूळाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार त्यांनी प्रकाशा-नंदुरबार मार्गावर तापी नदी पुलाजवळ वाहनांची तपासणी सुरू केली होती़ दरम्यान, गुरुवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास (एमएच 18-बीजे 4010 व एमएच 18-6208) या दोन दुचाकींना थांबवण्यात आल़े त्यांची तपासणी केली असता, एका दुचाकीच्या डिक्कीत बिबटय़ाची कातडी, तर दुस:या दुचाकीच्या डिक्कीत मांडूळ जातीचा जिवंत साप आढळून आला़. वनविभागाच्या पथकाने दुचाकी सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या जनाबापू कृपाराम पवार, शरद साहेबराव चव्हाण व ऑफिसर सुनक्या भोसले, रा़ जामदे, ता़ साक्री या तिघांना ताब्यात घेतल़े ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांनी मांडूळचा सौदा अघोरी विद्येसाठी शहादा व मध्य प्रदेश परिसरात केला असल्याची माहिती आह़े 20 लाख रुपयांमध्ये या मांडुळाची विक्री करण्यात येणार होती, असे सूत्रांनी सांगितल़े तिघांजवळ मिळून आलेल्या बिबटय़ाची कातडी साधारण 20 लाख रुपयांची असल्याची माहिती आह़े बिबटय़ाच्या कातडीसोबतच आणखी एका प्राण्याची कातडी वनविभागाच्या अधिका:यांना आढळून आली़ बिबटय़ा आणि अज्ञात प्राण्याची कातडी तपासणीसाठी डेहराडून (उत्तराखंड) व नाशिक येथील वनविभागाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आली़ या कातडीचा अहवाल आल्यानंतर तो न्यायालयात सादर होणार असल्याची माहिती सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी दिली़  कातडी आणि मांडुळाची खरेदी करणारे कोण, याची चौकशी करण्यात येत आह़े मांडूळचा सौदा करणा:यांचा वनविभागाचे पथक शोध घेणार असून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आह़े ही कारवाई मुख्य वनसंरक्षक टी़एऩ साळुंखे, उपवनसंरक्षक एस़बी़ केवटे, विभागीय वनअधिकारी उमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, सहायक वनसंरक्षक पी़आऱ पाटील, वनक्षेत्रपाल धनंजय पवार, वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, वनक्षेत्रपाल मनोज रघुवंशी, विवेक देसाई, ए़आऱ निकम, कल्पेश अहिरे, बी़जी़ तांबोळी, एऩटी़ थोरात, क़ेएऩ वसावे, जी़एम़ आढावणे, जी़बी़ डोंगरे, एस़आऱ सूर्यवंशी, गणेश गवळी, बी़सी़ कुवर, एस़एस़ तुंगार, बी़एस़ साळवे, एम़बी़ बोरसे, विशाल शिरसाठ यांनी केली़ जनाबापू पवार, शरद चव्हाण व ऑफिसर भोसले या तिघांविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम व भारतीय वन अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आह़े तपास गणेश रणदिवे व मनोज रघुवंशी करीत आहेत़ दरम्यान, जिल्ह्यात मांडूळ तस्करीचा हा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. बिबटय़ाची कातडी नेमकी कुठली आहे याबाबत आता वन विभागाच्या तपासावर लक्ष केंद्रीत होणार आहे.