शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

‘पद्मावत’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी बुडवला एक लाख 62 हजारांचा कर : हिंदू जनजागृती समितीचा नंदुरबार येथे आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 17:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वादग्रस्त ‘ पद्मावत ’ चित्रपटाचे निर्माते हे शासनाचा कर बुडवणारे असून याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी हिंदू जागृती समितीच्यावतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली़ नंदुरबार शहरातील विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस हिंदू जनजागृती समितीचे डॉ़ नरेंद्र पाटील, क्षत्रिय राणा राजपूत समाज सेवा समितीचे अध्यक्ष ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वादग्रस्त ‘पद्मावत’ चित्रपटाचे निर्माते हे शासनाचा कर बुडवणारे असून याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी हिंदू जागृती समितीच्यावतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली़ नंदुरबार शहरातील विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस हिंदू जनजागृती समितीचे डॉ़ नरेंद्र पाटील, क्षत्रिय राणा राजपूत समाज सेवा समितीचे अध्यक्ष चेतन राजपूत, सनातनचे सद्गुरू नंदकुमार जाधव, समितीच्या धुळे-जळगाव जिल्हा समन्वयक रागेश्री देशपांडे उपस्थित होत्या़ प्रसंगी माहिती देताना नंदकुमार जाधव यांनी सांगितले की, संजय लिला भन्साळी प्रोडक्शन्सच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा परिसरात मसाई पठारावर पद्मावत या चित्रपटाचे चित्रीकरण मार्च 2017 मध्ये करण्यात आले होत़े याप्रकरणी संबधितांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व वनविभाग यांच्याकडून घेतलेली परवानगी अटही पाळलेली नाही तसेच 20 दिवसांचे चित्रीकरणाचे एक लाख 91 हजार रूपये वैध शुल्क न भरता केवळ तीन दिवसांचे 28 हजार रूपये शुल्क भरले आह़े यातून शासनाची एक लाख 62 हजार 742 रूपयांची फसवणूक करणा:या संजय लिला भन्साळी यांच्या निर्मिती संस्थेवर फौजदारी गुन्हा करण्यात यावा़ यावेळी राणा राजपूत सेवा समितीचे चेतन राजपूत यांनी सांगितले की, 25 रोजी होणा:या भारत बंदमध्ये सहभाग राहणार आह़े नंदुरबार शहरात पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत राजपूत समाजातील ज्येष्ठ आणि युवकांची बैठक मंगळवारी होणार असून त्यानंतर निर्णय घेण्यात येणार आह़े नरेंद्र पाटील यांनीही शासनाची फसवणूक करणा:यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत कोल्हापूर पोलीस ठाण्यात चित्रपट निर्मात्यांविरोधात हिंदू जनजागृती समितीच्यावतीने गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती दिली़