शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य उपलब्ध करा, मग दवाखाने सुरू करतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खाजगी दवाखाने उघडे ठेवण्यासंदर्भात शासनाच्या आदेशाबाबत आयएमए संघटनेच्या नंदुरबार शाखेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून अडचणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : खाजगी दवाखाने उघडे ठेवण्यासंदर्भात शासनाच्या आदेशाबाबत आयएमए संघटनेच्या नंदुरबार शाखेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून अडचणी मांडल्या आहेत. आवश्यक ते साहित्य उपलब्ध झाले तर दवाखान्यांचे ओपीडी सुरू करण्यास हरकत नाही असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.कोरोनाच्या भितीमुळे जिल्ह्यातील ९० टक्के खाजगी दवाखाने व त्यांच्यामधील ओपीडी बंद आहे. यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणेनवर मोठा ताण पडत आहे. ही बाब लक्षात घेता खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने योग्य ती काळजी घेवून सुरू ठेवावे असे आदेश वजा सुचना शासनाने दिल्या आहेत. याबाबत आयएमए संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, दवाखान्यांमध्ये ओपीडी सुरू ठेवण्यास हरकत नाही. परंतु आवश्यक ते साहित्य उपलब्ध नाही. दवाखान्यांची जागा मोठी नसल्यामुळे एक मिटर अंतरावर रुग्णांना बसविणे, वेळोवेळी रुग्णांनी वापरलेले साहित्य अर्थात बसण्यासाठीचे बाक, जिना व इतर वस्तू तसेच डॉक्टरांनी तपासणीसाठी वारपलेले साहित्य निर्जंतूकीकरण वेळोवेळी करणे शक्य नाही.दवाखान्यात गर्दी झाल्यास त्यावर नियंत्रण ठेवणे अशक्य आहे. आधीच मॅनपॉवर कमी झालेली आहे. याशिवाय डॉक्टरांसाठी लागणारे एन-९५ मास्क, पीपीई किट, हॅण्ड सॅनीटायझर अपेक्षीत प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यांच्या किंमती अव्वाच्या सव्वा झाल्या आहेत.सर्वच रुग्णांची जवळून तपासणी करणे किंवा त्यांना स्पर्श केल्याशिवाय तपासणी होऊ शकत नाही अशावेळी हे साहित्य उपलब्ध असणे आवश्यक आहे. परंतु त्याचाच तुटवडा असल्याचेही या निवेदनात आयएमए संघटनेने म्हटले आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ.राजेश वळवी, सचिव डॉ.जयकुमार देसाई, खजिनदार डॉ.अनिकेत नागोटे आदींच्या सह्या आहेत.दरम्यान, दिल्ली, राजस्थानमधील भिलवाडा येथे खाजगी रुग्णालयातील डॉक्टर आणि त्यांच्या कर्मचाºयांना देखील कोरोना विषाणूची लागण झाल्याचे लक्षात घेता डॉक्टरांमध्ये पुन्हा धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या साहित्याची मागणी आणखी वाढली असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.सूट नसल्याने तळोद्यात डॉक्टरांनी घालावा लागला रेनकोटतळोद्यात खाजगी डॉक्टरांनी दवाखाने सुरु केले. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत रुग्णांना तपासणीसाठी आवश्यक असणारा सुट उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी चक्क रेनकोट घालून रुग्णांना तपासले. प्रशासनाने शहरातील खाजगी दवाखाने चालवणाºया डॉक्टरांची बैठक घेऊन दवाखाने अत्यावश्यक सेवा असल्याने संचारबंदीत ते सुरू ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले. जे डॉक्टर आपले दवाखाने बंद ठेवतील त्यांच्यावर प्रशासनाकडून कारवाई केली जाईल असा इशारा दिल्यानंतर आजपासून तळोदा शहरातील सर्वच दवाखाने सुरू असलेले दिसून आले. कोरणा विषाणूचा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांकडे रुग्णांना तपासण्यासाठी अत्यावश्यक कोट व अन्य साधनसामग्री नसल्याने डॉक्टरांनी चक्क पावसाळ्यात वापरायचा रेनकोट घालून रुग्णांची तपासणी केली. काही डॉक्टरांनी तर स्पेशल आॅर्डर देऊन रेनकोट खरेदी केले व दवाखान्यातील कर्मचाºयांना देखील उपलब्ध करून दिले असल्याचे सांगितले. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रेनकोट घालून रुग्ण तपासणी करताना अनेक डॉक्टर घामाघूम झालेले दिसून आले.