शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
2
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
3
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
4
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
5
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
6
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
7
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
8
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
9
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
10
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
11
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
12
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
13
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
14
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
15
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
16
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
17
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
18
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
19
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
20
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

रंगावलीच्या पुराने औद्योगिक प्रकल्पांचेही नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 13:47 IST

डाळ व यंत्रांचे नुकसान : 11 फुट संरक्षण भिंत तोडून पाणी शिरले; 75 लाखांची हाणी

नवापूर : 1976 साली आलेल्या महापुराची पुनरावृत्ती होवून येथील स्वस्तिक डाळ मिलमध्ये सुमारे 75 लाख रुपयांचे नुकसान झाले                    आहे. नदीकिनारी 11 फुट उंच           संरक्षक भिंत तोडून पुराचे पाणी घुसल्याने यंत्र व डाळीचे नुकसान झाले.16 ऑगस्टच्या पहाटे रंगावली नदीच्या महापुरात नदीकिनारी असलेली स्वस्तीक डाळ मिल भक्ष्य ठरली. नदी पात्रापासून 20 मीटर लांब असलेल्या या डाळ मिलच्या सर्व बाजुंनी सिमेंट काँक्रिट युक्त 11 फुट उंचीची संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. पुराचे पाणी या भिंतीच्या चार फुट वरून वाहून निघाल्याने संरक्षक भिंतीचा 400 फुट लांबीचा भाग पडून गेला. पुराच्या पाण्यास मोठी जागा उपलब्ध झाल्याने मिलच्या आतील सुमारे दोन एकर परिसरात हे पाणी घुसले. डाळ सुकविण्यासाठी असलेली प्रशस्त जागा व्यापल्यानंतर डाळीवर प्रक्रिया करून साठवणूक होत असलेल्या इमारतीत पुराचे पाणी शिरले. याठिकाणी चार फुटार्पयत पाणी घुसल्याने प्रक्रिया करून साठवलेली डाळ पाण्याखाली आली. सुमारे 45 लाख रुपये किमतीची ही डाळ पुराच्या पाण्यात खराब झाली. शिवाय यंत्र सामुग्री व संरक्षक भिंत, विद्युत खांब, संलगA सामान मिळून सुमारे 75 लाख रूपये किमतीचे नुकसान झाले आहे. मिलच्या आतील भागात गाळ पसरला असून, ट्रॅक्टरद्वारे गाळ काढण्याचे काम सुरू असून, पाण्याखाली गेलेल्या डाळीची दरुगधी येत असल्याने त्याची विल्हेवाट लावली जात आहे. पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका या डाळ मिलला बसला आहे.6 जून 1976 रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास रंगावली नदीला याहून अधिक भयावह महापूर आला होता. त्यात स्वस्तिक डाळ मिलमध्ये पुराचे पाणी शिरल्याने त्याकाळी दहा लाख रुपयानचे नुकसान झाले होते. आजच्या भावानुसार ही रक्कम नऊ कोटीच्या घरात आहे. जूनची सुरूवात असल्याने प्रक्रिया केलेल्या डाळीचा मोठा स्टॉक पाण्याखाली गेल्याने नुकसान              वाढले होते. 13 ट्रक भरून खराब झालेली डाळ फेकण्याची वेळ या उद्योग समुहावर आली होती.                1976 साली आलेल्या महापुराचे पाणी रेल्वे स्थानका पावेतो जावून पोहोचले होते. दोन्ही महापुरात स्वस्तिक डाळ समूह भक्ष्य ठरले हा योगा योग आहे.