लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शाळेच्या खोलीचा दरवाजा तोडून चोरटय़ांनी पोषण आहाराचा किराणाच चोरून नेल्याची घटना नंदुरबारातील नंदनवन प्राथमिक विद्यालयात घडली. शहरात भोणे रस्त्यावर नंदनवन प्राथमिक शाळा आहे. या शाळेच्या एका खोलीत पोषण आहार ठेवण्यात येतो. त्या खोलीचा दरवाजा तोडून चोरटय़ांनी आतील तुवर, हरभरा, मठ, तांदूळ व गोडतेल असा एकुण साडेसहा हजाराचा किराणा चोरटय़ांनी चोरून नेला. सकाळी ही बाब लक्षात आल्यावर पोलिसांना कळविण्यात आले.याबाबत मुख्याध्यापिका संगिता बाबुलाल शिंदे यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
शाळेतून पोषण आहार लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 12:06 IST