शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

नर्मदा खो:यातील सर्वच धरणे रिकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 17:54 IST

सरदार सरोवर भरण्याची प्रतिक्षा : साडेआठ मिटर पाण्याची पातळी खाली

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाकाय सरदार सरोवर प्रकल्पाचा जलपूजनानंतर देशभरात लक्षवेधी ठरलेल्या नर्मदा खो:यातील सर्वच्या सर्व आठ प्रकल्प अद्याप रिकामेच आहेत. दरम्यान, याच खो:यातील सर्वात शेवट असलेला सरदार सरोवर प्रकल्प अद्यापही साडेआठ मिटरने खाली असून तो भरण्याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.तब्बल 56 वर्षानंतर गेल्या 17 सप्टेंबरला जगातील दुसरा मोठा प्रकल असलेल्या सरदार सरोवर प्रकल्पाचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पामुळे विस्थापीत होणा:या महाराष्ट्रातील काही आणि मध्यप्रदेशातील सुमारे 40 हजार बाधितांचे पुनर्वसन बाकी असतांना त्याचे जलपूजन झाल्याने सर्वाचेच लक्ष नर्मदा खो:याकडे लागले आहे. खास करून सरदार सरोवर प्रकल्प त्याची उंची वाढवावी कि कमी करावी  याबाबत यापूर्वीच वादातीत ठरला आहे. या वादातही प्रकल्पाची उंची 138.68 मिटर्पयत पुर्ण वाढविल्याने सर्वानाच तो भरण्याची प्रतिक्षा आहे. कारण यापूर्वी सरदार सरोवर प्रकल्पावर गेट बसविण्यापूर्वी त्या ठिकाणी 131 मिटर्पयत पाण्याची पातळी वाढली होती. धरण पुर्ण झाल्यानंतर ते भरल्यास त्याच्या पाणलोटात किती भागाला धोका पोहचू शकतो याचे ख:या अर्थाने प्रत्यक्षात चित्र समोर येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प पुर्ण भरल्यानंतर सर्वाना त्याचे उत्तर मिळणार आहे. पण त्यासाठी अजून महिनाभर तरी प्रतिक्षा करावी लागेल असे चित्र आहे. शिवाय पाऊस न झाल्यास यंदा प्रकल्प भरेल की नाही याबाबत साशंकताच आहे. कारण सद्य स्थितीत नर्मदा खो:यातील सर्व आठ प्रकल्प अजूनतरी भरलेले नाही. या खो:यात सुरुवातीला असलेला बर्गी प्रकल्पाची उंची 422.76 मिटर असून त्यात सद्यस्थितीत 420.05 मिटर पाणीसाठा आहे. तर बुरमनघाट प्रकल्प 322 मिटरपैकी 308.24 मिटर भरला आहे. तवा प्रकल्पाची उंची 355.40 मिटर असून त्यात 350.34 मिटर पाणीसाठा आहे. इतर प्रकल्पांची स्थिती अशी कंसात धरणाची एकुण उंची मिटरमध्ये- होशांगाबाद (293.83) 285.35 मिटर, आयएसपी रिझरव्हायर (162.3) 252.07, ओएसपी रिझरव्हायर (196.60) 190.98, मंडलेश्वर (157.29) 142.30. सर्वच प्रकल्पात दोन ते 15 मिटरने अद्याप खाली आहेत. सरदार सरोवर प्रकल्पाची उंची गेट बसल्यानंतर 138.68 असून त्यात सद्यस्थितीत 130 मिटर पाणीसाठा आहे.