शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

शेतकऱ्यांना आता टोळधाडीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोना या महामारीच्या आर्थिक सावटातून अजूनही शेतकरी सावरलेला नाही. तोच गुजरात व मध्यप्रदेशातून येणाºया ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : कोरोना या महामारीच्या आर्थिक सावटातून अजूनही शेतकरी सावरलेला नाही. तोच गुजरात व मध्यप्रदेशातून येणाºया टोळधाड या किटकांचा प्रादुर्भाव आपल्याकडे येण्याची दाट शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. ही कीड मुख्यता कोणत्याही पिकाचा व फळांच्या हिरव्या पाल्यावर हल्ला चढवित शेतच्या शेत एका रात्रीतून उद्ध्वस्त करीत असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आतापासूनच भर पडली आहे. कृषी विभागाने कापूस लागवड अथवा खरीप पेरणी पूर्वीच याप्रकरणी आतापासूनच उपाययोजनांबाबत शेतकºयांमध्ये प्रत्यक्ष जनजागृती करावी, अशी अपेक्षा आहे.गेल्या अडीच महिन्यांपासून कोरोनाच्या महामारीने आपल्या देशाबरोबरच संपूर्ण जग ढवळून निघाले आहे. या महामारीचा फटका सर्वच क्षेत्र झेलत आहेत. त्यातच शेतकरी वर्गाला तर मोठ्या प्रमाणात सोसावा लागला आहे. तरीही त्याच्या सावटातूनच कसा बसा सावरट नाही. तोच गुजरात-मध्यप्रदेशाकडून येणाºया टोळधाड या तीन कीटकांचा प्रादुर्भाव राज्यातील नंदुरबार, धुळे, जळगाव या खान्देशातील तीन जिल्ह्यांसह या राज्याच्या सीमावर्ती असलेल्या १० जिल्ह्यांमध्ये पसरण्याची दाट शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. त्यासाठी स्थानिक तालुका कृषी प्रशासनास त्याचा प्रादुर्भाव थोपविण्यासाठी अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.साहजिकच यामुळे शेतकºयांच्या चिंतेत भर पडली आहे. नाकतोड्या सारखी असणाºया या किटकांचा थवाचा थवा एका शेताचा संपूर्ण फडशा पाडल्यानंतर लगेच प्रादुर्भाव करतो. एका रात्रीतून जवळपास १० ते १२ किलो मीटर अंतर क्षेत्रफळावरील क्षेत्रात त्याचा प्रादुर्भाव होत असतो. म्हणजे एवढे फळबाग असो अथवा इतर कोणत्याही पिकाचे संपूर्ण हिरवे पानेच खाऊन टाकतो. त्यामुळे संपूर्ण पीकच नष्ट होत असते. त्याचबरोबर फुले, फळे, बिया, फादी व पालवी याचाही फडशा पाडत असतो. वास्तविक शेतकºयांनी आताच खरीप हंगामापूर्वीची मशागतीची कामे युद्ध पातळीवर प्रयत्न करून पूर्ण केली आहेत. सद्या कपाशीच्या लागवडीत शेतकरी सज्ज झाला आहे. परंतु कृषी विभागाने टाळधाडेचा इशारा दिल्यामुळे शेतकºयांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. काय करावे अशा विवंचनेत शेतकरी पडला आहे. आता तालुका कृषी विभागाने शेतकºयांच्या पेरण्या व कापूस लागवडी पूर्वी आपल्या कृषी कर्मचाºयांच्या माध्यमातून जनजागृती करण्याची गरज आहे. त्यासाठी कशा उपाययोजना कराव्यात या विषयीचे प्रत्यक्ष जागेवर जावून शेतकºयांना प्रशिक्षण दिले पाहिजे. त्याच बरोबर किडीचा प्रादुर्भावाबाबत सातत्याने आढावा घेण्याचीही आवश्यकता आहे. ही टाळधोड पर्यावरणासाठीदेखील हानीकारक ठरू शकते, असे कृषी विभागाने म्हटले आहे. या किडीचा धोकेदायक प्रादुर्भाव लक्षात घेऊन कृषी विभागानेही अधिक सजग राहण्याची अपेक्षा शेतकºयांनी केली आहे.ही टोळ तांबूस रंगाची असते. अत्यंत खादाड व नुकसान करणारी आहे. एका टोळधाडीत असंख्य टोळ असतात. त्यामुळे त्यांचे थवे तयार होत असतात. हे थवे वाटेतील वनस्पतींचा म्हणजे पिकांचा फडशा पाडत पुढे सरकत जातात. सायंकाळ झाल्यावर झाडा-झुडपांमध्ये वस्तीत राहतात. एक चौरस कि.मी. क्षेत्रात जर टोळधाड असेल तर त्याचात तीन हजार क्विंटल टोळ असतात.टोळने अंडी घातलेल्या जागा शोधून जमिनीच्या भोवताली चर खोदल्यास पिकांना अटकाव करून नियंत्रणात आणता येते. संध्याकाळी, रात्रीच्या वेळी, झाडा-झुडपांवर टोळ जमा होतात. अशा वेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटवून तसेच टायर जाळून धूर केल्याने नियंत्रणात येते. थव्यांच्या स्थितीत पिलांची संख्या जात असल्यास नीम तेल प्रतिहेक्टरी अडीच लिटर फवारणी करावी. मिथील पॅराथीआॅन दोन टक्के भूकटी २५ ते ३० किलो प्रति हेक्टरी धुरळणी करावी. त्याचबरोबर प्रत्येक गावातील शेतकºयांनी स्वत: गट तयार करावेत. रात्री शेतात पाहणी व देखरेख करावी. रात्री लाखोंच्या संख्येने टोळ शेतात उतरतात. त्यामुळे डब्बे, पत्रे, ढोल सायरन व ट्रॅक्टरचा आवाज करणे याशिवाय थवे येतांना दिसल्यास मशाली किंवा टेंभे लावून त्यांना हाकलून लावावे.गुजरात-मध्य प्रदेश व राज्यस्थानात मोठा प्रादुर्भाव असलेल्या या टोळधाड किटकाच्या आपल्याकडे येण्याचा अलर्ट देण्यात आला आहे. मुख्यता पिके, फळबागांच्या हिरव्या पानांवरच अ‍ॅटॅक करून पिके उद्ध्वस्त करतात. शेतकºयांनी आतापासूनच सावध राहून उपाययोजनांबाबत कृषी कार्यालयाशी संपर्क करावा.- नरेंद्र महाले, तालुका कृषी अधिकारी, कृषी कार्यालय, तळोदाकोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कमी मालामुळे कवडी मोल किंमतीत माल विकावा लागल्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच आता टोळधाड किटकांचा प्रादुर्भाव वाढण्याच्या शक्यतेमुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे. अजून पेरणी व कापूस लागवड बाकी असल्यामुळे उपाययोजनांसाठी कृषी विभागाने शेतकºयांना प्रत्यक्ष प्रशिक्षण द्यावे.-हेमंत उगले, शेतकरी, रांझणी, ता.तळोदा