शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

‘लॉकडाऊन’मुळे विसरवाडी बाजारपेठेत पसरली अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : धुळे -सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व विसरवाडी-सेंधवा महामार्गावर वसलेले नवापुर तालुक्यातील विसरवाडी गाव ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : धुळे -सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व विसरवाडी-सेंधवा महामार्गावर वसलेले नवापुर तालुक्यातील विसरवाडी गाव आहे. लॉकडाऊनमुळे पूर्णपणे प्रभावित झाले असून व्यापारीपेठ गजबजणाऱ्या विसरवाडी गावावर गेल्या पाच दिवसांपासून अवकळा पसली आहे़विसरवाडी हे गाव दोन आंतरराज्यीय महामार्गावर वसलेले तालुक्यातील व जिल्ह्यातील नावलौकिक असलेली मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे़ गावाची लोकसंख्या सुमारे १२ हजार असून येथील बाजारपेठेत परिसरातील ४० ते ५० खेड्यांचा दैनंदिन संपर्क येतो. बाजारपेठ प्रशस्त व जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त असल्याने बाहेरगावाहून मोठ्या संख्येने व्यापारी येथे येऊन व्यापार करतात़ मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विसरवाडी बाजारपेठेसह गावातही शुकशुकाट असून आजवर अशी शांतता येथील नागरिकांनी कधीच अनुभवली नसल्याचे बोलले जात आहे़ कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आधी महाराष्ट्र आणि नंतर केंद्र सरकारने तातडीची पावले उचलत कारवाई केली होती़ यात जमावबंदी आदेश व नंतर संचारबंदी लागू करण्यात आली़ पाठोपाठ लॉकडाऊनची घोषणा झाली़ यातून पहिल्याच दिवशी गैरसमज निर्माण होऊन रात्रीच किराणा दुकानांवर गर्दी उसळली होती़ यावेळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांनी गावात भेटी देत नागरिकांना मार्गदर्शन केले़ गर्दी करु नये असे सांगितल्यानंतर दुकाने बंद झाली होती़ यातून मंगळवारपासून सुरळीतपणे जीवनावश्यक वस्तंूचे वितरण सुरु आहे़नवापुर आणि धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याला लागू असलेल्या विसरवाडी येथे दोन्ही जिल्ह्यातील ग्रामस्थांसोबतच दोन्ही महामार्गांवरुन जाणाºया वाहनांचा राबता असतो़ यातून मग लॉकडाऊननंतर पोलीस, महसूल आणि पंचायत समिती प्रशासनाने याठिकाणी दक्षता घेत उपाययोजनांना प्राधान्य दिले आहे़ सध्या गावात पोलीस अधिकारी व कर्मवारी हे सातत्याने गस्त घालून गावात विनाकारण भटकंती करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत़ कारवाईदरम्यान पोलीस युवकांना योग्य ती माहिती देत घरीच राहण्याचे सुचवत आहेत़

ग्रामपंचायतीमार्फत दुकानदारांना अत्यावश्यक सेवा देणारे दुकाने कधी व किती वेळ सुरु ठेवली पाहिजेत याबाबत माहिती दिली जात आहे़ यासाठी ग्रामपंचायतीने पत्रके वाटप केली आहेत़ गावात प्रत्येक दुकानाच्या बाहेर ग्राहकांना उभे राहण्यासाठी विशिष्ट अंतरावर चौकट आखून दिली आहे़ औषधी विक्रीचे दुकाने सुरु आहेत़ किराणा भाजीपाला, पिठाची गिरणी सकाळी आठ ते दुपारी १२ पर्यंत सुरु आहेत़ विसरवाडी येथे दर गुरुवारी आठवडे बाजाराची परंपरा आहे़ जिल्ह्यातून व्यापारी मोठ्या संख्येने येथे येत असल्याने ही बाजारपेठ प्रसिद्ध आहे़ आठवडे बाजार बंद असल्याने मोठे नुकसान होत आहे़ दरम्यान गावातील घराघरातही कोरोनाची भिती असल्याने बाहेर निघणे टाळले जात आहे़ बाहेरगावी गेलेल्यांची तपासणी करुनच त्यांना गावात घेतले गेल्याची माहिती असून रुग्णालयात सध्या गर्दी आहे़कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसरवाडी ग्रामपंचायतीतर्फे नवापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, सरपंच बकाराम गावित, विस्तार अधिकारी दिलीप कुवर, ग्राम विकास अधिकारी कैलास सोनवणे तसेच कर्मचारी वेळोवेळी विसरवाडी येथे ग्रामस्थांना व दुकानदारांना मार्गदर्शन करीत आहेत तसेच लहान मुलांना वृद्ध व्यक्तींना घरीच ठेवावे सर्वांनी तोंडाला मास्क बांधावा असे सांगितले जात आह़ेगावातील दोन्ही महामार्गावरील त्याप्रमाणे गावातील हॉटेल व्यवसाय गेल्या पाच दिवसापासून बंद अवस्थेत आहेत़ यामुळे हॉटेल कामगारांची स्थिती बिकट झाली आहे़ गावातील सर्व प्रार्थना स्थळांना कुलुप लावण्यात आले आहे.