लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील 36 मतदान केंद्रांवर वेब कास्टींग अर्थात थेट प्रेक्षेपण केले जाणार आहे. याशिवाय सखी मतदान केंद्र देखील कार्यान्वीत राहणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती थवील यांनी दिली. मतदानाच्या तयारीविषयी माहिती देतांना स्वाती थवील यांनी सांगितले, मतदारसंघात 361 मतदान केंद्र आहेत. त्यातील दहा टक्के अर्थात 36 मतदान केंद्रांवर वेब कास्टींग केले जाणार आहे. त्यात वैजालीचे 11 क्रमांकाचे मतदान केंद्र, पिंगाणे 23, प्रकाशा 30, डामरखेडा 37, कळंबू 63, सारंगखेडा 75, वडाळी 104, तोरखेडा 112, कोरीट 123, लहान शहादा 130, खोंडामळी 145, करजकुपे 159, सुंदरदे 161, पातोंडा 170, भालेर 177, कोपर्ली 185, चौपाळे 200, दुधाळे 205, रनाळे 211, नांदर्खे 233, शनिमांडळ 238, तिलाली 244, सैताणे 250, वैंदाणे 256, नंदुरबार शहरातील 11 मतदान केंद्रांचा समावेश आहे.याशिवाय सखी मतदान केंद्र देखील राहणार आहे. मिशन विद्यालयातील इमारतीत हे केंद्र तयार करण्यात येणार आहे.निवडणूक कर्मचा:यांना 20 ऑक्टोबर रोजी जिल्हा क्रिडा संकुलाच्या मैदानात निवडणूक साहित्य वाटप केले जाणार आहे. मतदान यंत्र ठेवण्याचे अर्थात स्ट्राँग रूमचे ठिकाण हे सरकारी धान्य गोदामात राहणार आहे. त्याच ठिकाणी 24 रोजी मतमोजणी देखील करण्यात येणार असल्याची माहिती स्वाती थवील यांनी दिली.
Vidhan sabha 2019: 36 मतदान केंद्रातून होणार थेट प्रेक्षेपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 12:03 IST