शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

साक्षरता झाली 71 टक्के तरीही राज्यात शेवटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 11:46 IST

साक्षर भारत मिशनही फेल : दहा वर्षात केवळ सहा टक्के वाढ

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्याची साक्षरता दहा वर्षात 64 वरून 71 टक्केर्पयत आली असली तरी राज्यात नंदुरबार साक्षरतेबाबत सर्वात शेवट असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. साक्षर भारत मिशन अंतर्गत झालेल्या कामाचा अहवाल प्रसिद्ध झाला असून त्यात नंदुरबारची साक्षरता सात टक्क्यांनी वाढली आहे.  साक्षरता, दरडोई उत्पन्न व मानव निर्देशांकात पिछाडीवर असलेल्या नंदुरबार जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वच स्तरावर प्रय} सुरू आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मोजक्या आश्वासीत जिल्ह्यांमध्ये देखील नंदुरबारचा समावेश केलेला आहे. या अंतर्गत विविध विकास कामे व उपक्रम सुरू आहेत. आता साक्षरता 71 टक्केर्पयत आली असली तरी ती राज्यातील जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात कमी असल्याचे समोर आले आहे.  साक्षरतेबाबत नंदुरबार आजही तळाला असल्याचे यावरून स्पष्ट होते.56 वरून 71 टक्के..नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर 2001 मध्ये झालेल्या जनगणनेत जिल्ह्याची साक्षरता 56.00 टक्के इतकी होती. जिल्हा निर्मितीनंतर शिक्षणाची साधने वाढली, सातुपडय़ाच्या दुर्गम भागार्पयत दळणवळण यंत्रणा पोहचली. परिणामी जिल्ह्यात साक्षरतेची टक्केवारी 55 वरून दहा वर्षात अर्थात 2011 च्या जनगणनेत 64.38 टक्केर्पयत पोहचली. तरीही जिल्हा साक्षरतेबाबत बराच मागे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुन्हा साक्षरता वाढीसाठी प्रय} सुरू झाले. त्यासाठी 2009 मध्ये सुरू करण्यात आलेल्या साक्षर भारत मिशनचा आधार घेण्यात आला. या मिशनअंतर्गत जास्तीत जास्त निरक्षरांना साक्षर करण्यासाठी प्रय} सुरू झाले. त्यासाठी वेगळी यंत्रणा उभारण्यात आली. एवढे करूनही 2009 ते 2019 या कालावधीत साक्षरतेची आकडेवारी केवळ सात टक्क्यांनी वाढू शकली. काय होते मिशनसाक्षर भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यातील 15 वर्षापेक्षा मोठय़ा निरक्षरांचा सव्र्हे करून त्यांना साक्षरता वर्गामध्ये आणण्यात येणार होते. या निरक्षरांना शिकविण्यासाठी अर्थात किमान तिसरी इयत्तेच्या लेव्हलचे शिक्षण समजावे यासाठी प्रेरकांची नियुक्ती करण्यात आली. या प्रेरकांना जिल्हा व तालुका स्तरावर प्रशिक्षीत करून त्यांना साक्षरता मिशनचे कार्य देण्यात आले. या प्रेरकांतर्फे गाव, पाडय़ांवर जावून निरक्षकांना साक्षर करण्याचे काम देण्यात आले. परंतु दहा वर्षात साक्षर भारतचे काम फारसे प्रगतीत झाले नाही हे स्पष्ट आहे.