शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशातील घटना : खोदकाम करताना सापडल्या मूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : भोई गल्लीतील घराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना काळ्या पाषाणातील विष्णू व लक्ष्मी अवतारातील दोन मुर्ती सापडल्या. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर बघ्यांची एकच गर्दी झाली होती. दरम्यान, 40 ते 45 वर्षापूर्वीदेखील गावात अशा प्रकारच्या मुर्ती सापडल्या होत्या.प्रकाशा, ता.शहादा येथील गौतमेश्वर मंदिराकडे जाणा:या मार्गावर सदा भोई यांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : भोई गल्लीतील घराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना काळ्या पाषाणातील विष्णू व लक्ष्मी अवतारातील दोन मुर्ती सापडल्या. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर बघ्यांची एकच गर्दी झाली होती. दरम्यान, 40 ते 45 वर्षापूर्वीदेखील गावात अशा प्रकारच्या मुर्ती सापडल्या होत्या.प्रकाशा, ता.शहादा येथील गौतमेश्वर मंदिराकडे जाणा:या मार्गावर सदा भोई यांचे घर आहे. भोई हे घराच्या मागील बाजूस जेसीबीच्या मदतीने खोदकाम करीत असताना त्यात दोन काळ्या पाषाणाचा आकर्षक मूत्र्या आढळून आल्या. मात्र या मूर्ती खंडित असून, त्यांची चार ते पाच फुटार्पयत उंची आहे. या वेळी भावेश बागडे व तुषार भोई यांनी या मूर्ती उचलून बाहेर ठेवल्या व पाण्याने स्वच्छ केली असता एक मूर्ती विष्णूची तर एक देवीची आहे. या मूर्ती पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या वेळी नागरिकांनी मूर्त्ीची पूजा करून दर्शन घेतले.याआधीही 1972 - 73 मध्ये न्हावी गल्लीतील पाण्याच्या पाईपलाईनचे खोदकाम करताना विष्णूची व कानुमातेची मूर्ती निघाली होती. त्या वेळी धुळे येथील राजवाडे संशोधन केंद्रातील अभ्यासकांनी येवून पाहणी करून काही मूर्ती धुळे येथे ठेवल्या आहेत. मात्र विष्णूची मूर्ती ज्या ठिकाणी निघाली त्या ठिकाणी मंदिर बांधून स्थापना करून देण्यात आली आहे.मूर्ती निघाल्याचे वृत्त वा:यासारखे सर्वत्र पसरले. मात्र प्रशासनातील तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हा प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याने अद्यापही मूर्ती त्याच ठिकाणी आहेत. त्यामुळे पुरातत्व विभागाने दखल घेवून या मूर्तीबाबत अधिक संशोधन करून ग्रामस्थ व भाविकांना माहिती करून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.