शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

आयुष्य ‘लाॅक’; पेट्रोल दरवाढ ‘अनलाॅक’ ३० वर्षांत लिटरमागे ८९ रुपयांची वाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:30 IST

नंदुरबार : कोरोनाची दुसरी लाट अन् लाॅकडाऊन यातून मार्ग काढत नेटाने पुढे जाणाऱ्या नागरिकांना आता महागाईचे चटके ...

नंदुरबार : कोरोनाची दुसरी लाट अन् लाॅकडाऊन यातून मार्ग काढत नेटाने पुढे जाणाऱ्या नागरिकांना आता महागाईचे चटके बसण्यासही सुरुवात झाली आहे. यात पेट्रोलचे दर १०० रुपये प्रती लिटरच्या उंबरठ्यावर पोहोचले असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या तीस वर्षांत पेट्रोलचे दर हे थेट ८९ रुपयांनी वाढल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात सध्या कोविड नियमांचे पालन करत नागरिक लाॅकडाऊनमध्ये सहभागी झाले आहेत. यातून अनेकांचे व्यवसाय बंद आहेत, तर दुसरीकडे गोरगरीबही अडचणीत आले आहेत. लाॅकडाऊनमुळे दैनंदिन कमाई नसल्याने अनेकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. यातच शहर व जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर पेट्रोलचे प्रती लिटर दर चार ते १३ मे या दरम्यान सातत्याने वाढून ९९ रुपये २९ पैसे एवढे झाला आहे. चार मे राेजी हे दर ९७ रुपये होते. केवळ एका आठवड्यात अडीच रुपयांनी पेट्रोलचे दर वाढल्याने सकाळी बाजारपेठेत येणाऱ्यांना पेट्रोलच्या खर्चात कपात करावी लागत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

पेट्रोलची वाहने वापरावर आता नियंत्रण आणावे लागेल. गाड्यांना ॲव्हरेज अधिक नसल्याने साधारण तीन दिवसांनंतर पेट्रोल टाकावे लागते. आता पेट्रोलसाठी वाढीव खर्च करावा लागेल. यातून आर्थिक नियोजन कोलमडणार आहे. लाॅकडाऊन उघडल्यानंतर या समस्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

-सुनील माळी, नंदुरबार,

पेट्रोल दरवाढीमुळे सायकलचा वापर करावा लागण्याची वेळ येऊन ठेपली आहे. नागरिकांना पेेट्रोल दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे. आधी लाॅकडाऊनमुळे व्यवसाय बंद असल्याने सर्वच स्तरातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातून पुन्हा पेट्रोल दरवाढ झाल्याने चिंता वाढल्या आहेत.

-योगेश बच्छाव, नंदुरबार.

नंदुरबारात अधिभार कमी झाल्याने....

नंदुरबार शहरात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलांचा खर्च वसूल करण्यासाठी शहरात पेट्रोलवर सेझ लावण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. दोन वर्षांपूर्वीच हा वाढीव सेझ मागे घेण्यात आला आहे. हा सेझ आज लागू असता, तर नंदुरबार शहरात देशात सर्वप्रथम १०० रुपये पेट्रोल मिळाले असते. दरम्यान, जिल्ह्यासाठी पाठवण्यात येणा-या पेट्रोलची मूळ किंमत ही ५७ रुपये ७२ पैसे आहे. यात केंद्र सरकारकडून १७ रुपये ९८ पैसे प्रति लिटर एक्साईज ड्युटी, रोड सेस, पेट्रोलपंप चालक व मालकांचे प्रती लिटर ३ रूपये ५६ रुपयांचे कमिशन, राज्य शासनाचा १९ रुपये ८२ पैशांचा व्हॅट लावून पेट्रोल ९९ रुपये दराने ग्राहकांना वितरित केले जात आहे.

लाॅकडाऊनमध्ये वापर कमी तरीही झळ बसणार

n लाॅकडाऊन सुरू असल्याने सकाळी ११ वाजेपर्यंत बाजारात वावरण्याची मुभा नागरिकांना दिली जाते. यामुळे सकाळपासून दुचाकी वाहने घेत नागरिक सकाळपासून बाजारात येतात. बाजारही विखुरलेला असल्याने वाहनांचा वापर वाढला आहे. यामुळे पेट्रोलचा खर्च वाढला असल्याचे नागरीकांकडून सांगण्यात आले.