विसरवाडी : नवापूर तालुक्यातील डाबरीफळी तिळासर येथे प्रेमीयुगुलांनी आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज पहाटे सुमारास घडली.पोलीस सूत्रांनुसार समुवेल सुदाम गावीत (३४) रा.डाबरीफळी तिळासर व सपना निलेश गावीत (३२) रा. नानगीपाडा यांचे पूर्वीच जाती रिवाजाप्रमाणे विवाह झालेला असताना त्यांचे आपसात प्रेमसंबंध जुळले. विवाहित असताना त्यांच्या प्रेम संबंधाला दोघांचेही कुटुंब संमती देतील की, नाही या भीतीपोटी दोघांनीही १६ मे रोजी रात्री १२:३० ते पहाटे ४ यादरम्यान डाबरीफळी तिळासर येथील त्याचे वडील सुदाम गावीत यांच्या शेतातील बांधावरील आंब्याच्या झाडाला एकाच फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली़ याबाबत त्याचे वडील सुदाम मंश्या गावीत यांनी दिलेल्या खबरीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे पुढील तपास हवालदार भीमसींग ठाकरे करत आहे़
एकत्र गळफास घेऊन संपवले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 12:23 IST