शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

दीड लाखाच्या चोरीतील आरोपी एलसीबीने केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ब्रिटीश अंकुशविहिर, ता.अक्कलकुवा येथील दीड लाखाच्या चोरीच्या घटनेतील संशयीत दोघांना एलसीबीच्या पथकाने तळोदा येथे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ब्रिटीश अंकुशविहिर, ता.अक्कलकुवा येथील दीड लाखाच्या चोरीच्या घटनेतील संशयीत दोघांना एलसीबीच्या पथकाने तळोदा येथे अटक केली. त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.संदीप अरुण तडवी व अजय भामट्या वळवी, दोन्ही रा.बेडापाडा, ता.तळोदा अशी संशयीतांची नावे आहेत. अक्कलकुवा तालुक्यतील ब्रिटीश अंकुश विहिर येथील संजय तडवी यांच्या घरातून चोरट्यांनी १४ मे रोजी रात्री दीड लाख रुपये रोख व तीन मोबाईल चोरून नेले होते.चोरीच्या या घटनेबाबत एलसीबीकडून तपास सुरू होता. नुकतेच पॅरोलवर सोडलेल्या काही चोरट्यांवर एलसीबीची नजर होती. त्यादृष्टीने पाळतही ठेवण्यात आली होती. परंतु त्यातील कुणीही यात सहभागी नसल्याचे स्पष्ट झाल्यावर एलसीबीने दुसरीकडे मोर्चा वळविला.याच दरम्यान, तळोदा येथे दोन युवक महागडे मोबाईल कमी किंमतीत विक्री करीत असल्याची माहिती पोलीस निरिक्षक किशोर नवले यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तातडीने पथकाला पाठवलि. तळोद्यातील स्मारक चौकात चॉकलेटी रंगाच्या दुचाकीवर दोन युवक संशयीतरित्या आढळले.त्यांची चौकशी करीत त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी संदीप तडवी व अजय वळवी अशी त्यांची नावे सांगितली. त्यांची झडती घेतली असता तीन महागडे मोबाईल त्यांच्याकडे आढळले. त्यांना बोलते केले असता त्यांनी ब्रिटीश अंकुश विहिर येथील चोरीची कबुली दिली. त्यांना अक्कलकुवा पोलिसांच्यात ताब्यात देण्यात आले.त्यांच्याकडून दोन मोबाईल, दुचाकी जप्त करण्यात आली. रोख रक्कमेचीही माहिती काढली जात आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, उपनिरिक्षक योगेश राऊत, हवालदार दिपक गोरे, सुनील पाडवी, मोहन ढमढेरे, विजय ढिवरे यांच्या पथकाने केली.