शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

नंदुरबारात डॉक्टर विरूद्ध वकीलची लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 12:43 IST

नंदुरबार लोकसभा मतदार संघ : स्वातंत्र्यानंतर प्रथमच तुल्यबळ उच्चशिक्षित उमेदवार

रमाकांत पाटील ।नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदार संघात पारंपारिक काँग्रेस विरूद्ध भाजप अशी पक्षीय लढत असली तरी या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही पक्षांतर्फे या वेळी प्रथमच डॉक्टर व वकीलीची पदवी घेतलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.नंदुरबार लोकसभा मतदार संघात काँग्रेस, भाजप व वंचित बहुजन आघाडी या तिन्ही पक्षातर्फे उमेदवार जाहीर झाले आहेत. अजून काही संघटना व अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहण्याची शक्यता आहे. अर्थात मतदार संघातील राजकीय चित्र पाहता या ठिकाणी काँग्रेस विरूद्ध भाजप अशीच लढत रंगणार आहे. काँग्रेसने अ‍ॅड.के.सी. पाडवी यांना तर भाजपने विद्यमान खासदार डॉ.हिना गावीत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आजवरच्या या मतदार संघातील लढतीचे चित्र पाहता या वेळी प्रथमच दोन तुल्यबळ पक्षांचे पदवीधर उमेदवार रिंगणात आहेत. या पूर्वी अ‍ॅड.के.सी. पाडवी यांनी जनता दलातर्फे दोन वेळा उमेदवारी केली आहे. दोन्ही वेळा ते पराभूत झाले. मात्र त्यांचे प्रतीस्पर्धी त्यावेळी काँग्रेसचे माणिकराव गावीत व भाजपचे कुवरसिंग वळवी होते. तिवारी काँग्रेसतर्फे स्व.गोविंदराव वसावे, भाजपतर्फे डॉ.सुहास नटावदकर, अखिल भारतीय सेनेकडून अ‍ॅड.पद्माकर वळवी यांनीही यापूर्वी उमेदवारी केली आहे. तथापि त्यांचे प्रतिस्पर्धी अर्थातच पदवीधर किंवा पद्वीत्तर शिक्षण घेतलेले नव्हते.या वेळी प्रथमच काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षातर्फे पदवीधर उमेदवार असून, डॉक्टर विरूद्ध वकील, अशी ही लढत रंगणार आहे. भाजपच्या विद्यमान खासदार डॉ.हिना गावीत यांनी यापूर्वीच प्रचाराला सुरूवात केली आहे. त्यांचे पिता डॉ.विजयकुमार गावीत, आमदार उदेसिंग पाडवी यांची त्यांना साथ आहे. तसेच शिवसेनेशी भाजपची युती असून, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही जवळ करण्यात प्रथमदर्शी त्यांना यश आले आहे.दुसरीकडे काँग्रेसचे अ‍ॅड.के.सी. पाडवी यांना ज्येष्ठ नेते आमदार अमरिशभाई पटेल, आमदार सुरूपसिंग नाईक, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत, आमदार डी.एस. अहिरे, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची साथ असल्याने तेही निवडणुकीत प्रमुख प्रतिस्पर्धी ठरले आहेत. काँग्रेसची राष्टÑवादीशी आघाडी असून, येत्या काळात राष्टÑवादीच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना त्यांना जोडावे लागणार आहे.गेल्या निवडणुकीत सलग नऊ वेळा विजयी झालेले माणिकराव गावीत यांचा पराभव केल्याने डॉ.हिना गावीत ह्या चर्चेत आल्या होत्या. गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाच्या बळावर त्या या वेळी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर काँग्रेसने सलग सहा वेळा विजयी झालेले आमदार व सुशिक्षित उमेदवार देवून आपला गड पुन्हा ताब्यात मिळविण्यासाठी सर्वशक्तीनिशी रनशिंग फुंकले आहे. या मतदार संघाची निवडणूक २९ एप्रिलला होणार असून, २ एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. त्यामुळे येत्या काळात मतदार संघातील राजकारण कसे वळण घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.