शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

23 वर्षापासून सातबारा उता-यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 12:54 IST

तहसीलदारांना साकडे : तळोदा तालुक्यातील अतिक्रमीत वनजमीनधारकांची व्यथा

तळोदा : गेल्या 23 वर्षापासून वनअतिक्रमित जमिनी महसूली  होऊनही अतिक्रमणधारक आदिवासी शेतक:यांना अजूनपावेतो जमिनीचे सातबारे मिळाले नसल्याने या शेतक:यांनी तहसीलदारांना साकडे घातले. दरम्यान, तहसीलदार योगेश चंद्रे यांनी चौकशी करून कार्यवाहीचे आश्वासन दिले.तळोदा तालुक्यातील कालीबेली, माळखुर्द, जामोनीपाडा, अमोनी, ढेकाटी, चौगाव खुर्द, धवाळीविहीर येथील जवळपास 800 शेतकरी 1978 पासून वनअतिक्रमीत जमीन आजतागायत खेडत असून ही जमीन शेतक:यांच्या  ताब्यात आहे. शिवाय 1994 पासून शासनाने सदर अतिक्रमीत जमिनी महसूलीदेखील केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. असे असताना गेल्या 23 वर्षापासून जमिनीचा सातबारा देण्याबाबत प्रशासनाने उदासीन धोरण घेतले आहे. सातबा:याअभावी जमीन असूनही भूमिहीन असल्याची गत आमची झाल्याची व्यथा या शेतक:यांनी  व्यक्त केली आहे. वास्तविक त्यांनी अतिक्रमीत जमिनीसाठी तब्बल 40 वर्षे शासनाविरोधात लढा दिला होता. या लढय़ानंतर सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला न्याय मिळवून दिला. तेव्हा आम्हास जमिनी मिळाल्या. आता सातबारा उता:यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यासाठीदेखील अनेकवेळा मोर्चे, आंदोलने, निवेदन देण्यात आले आहे. परंतु त्यावर तातडीने कार्यवाही होण्याऐवजी दिरंगाईचे धोरण अवलंबले जात आहे. त्यामुळे या शेतक:यांनी पुन्हा सातबारा उता:यासाठी तहसीलदार योगेश चंद्रे यांची भेट घेऊन तातडीने साताबारा उतारे देण्याची मागणी केली. 2011 मध्ये तत्कालीन प्रशासनाने या शेतक:यांसोबत सातबारा देण्याबाबत प्रत्यक्ष चर्चाही  केली होती. मात्र त्यावर अजूनही कार्यवाही झालेली नाही. परिणामी आजही हे शेतकरी आपापल्या जामिनीच्या सातबारा उताराच्या प्रतीक्षेत आहेत. निदान आता तरी आपण आपल्या स्तरावर कार्यवाही करून सातबारे उतारे द्यावेत, अशी मागणी अमोनीचे उपसरपंच दिलीप पावरा, कालूसिंग वळवी, जगन वळवी, मगन वळवी, समका वसावे, लीला वसावे, विमल वसावे, दिवल्या वळवी, कालीबाई वळवी, सारपीबाई वसावे आदींनी केली आहे.