शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार वन विभागात मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहाराचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 11:48 IST

वन विभागाच्या मस्टरवर एकाच व्यक्तीचे अंगठे !

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार वन विभागातील कामांमध्ये मृत मजूर व एकच मजूर एकाच वेळी दोन ठिकाणी काम करीत असल्याचे मस्टर उघडकीस आल्यानंतर याच विभागात इतर अनेक कामांमध्ये अशीच पुनरावृत्ती घडल्याचा प्रकार समोर आला आहे. यापूर्वी 2012 च्या कामातील तक्रारीबाबत वन विभागाने मजुरांचे ठसे तपासणी केले असता एकाच व्यक्तीने मजुरांची नावे लिहून अंगठे केल्याचे समोर आले आहे.नंदुरबार वन विभागातील विविध कामांबाबत सातत्याने गैरव्यवहाराच्या तक्रारी झाल्या आहेत. यासंदर्भात चौकशीही झाल्या असून काही प्रकरणात गुन्हेही दाखल झाले आहेत.   अंबापूर, ता.नंदुरबार येथील कक्ष क्रमांक 151 ते 153 मध्ये 22 जानेवारी 2012 ते 30 जानेवारी 2012 या कालावधीत झालेल्या कामांची चौकशी वरिष्ठ पातळीवर नुकतीच झाली आहे. या कामावर बोगस मजुर दाखवून अंगठे केल्याच्या तक्रारी होत्या. त्यानुसार चौकशी अधिकारी, विभागीय वन अधिकारी (दक्षता) यांनी संबधीत मजुरांना कार्यालयात बोलवून त्यांच्या अंगठय़ाचे ठसे घेतले होते. हे ठसे तपासणीसाठी पुणे येथील पोलीस अधीक्षक अंगुली मुद्रा केंद्राकडे पाठविले होते. त्यांनी अंगठय़ाच्या ठशांची तपासणी करून अहवाल दिला असून त्या अहवालात हजेरी पत्रकातील ठसे व प्रत्यक्ष मजुरांनी केलेले ठसे जुळत     नसल्याचे स्पष्ट म्हटले आहे. या मजुरांच्या नावासमोर उमटवलेले ठसे  हे एकाच व्यक्तीने केल्याचा    निष्कर्षही अहवालात देण्यात आला आहे.एकुणच या प्रकरणासह अनेक कामांबाबत तक्रारी वाढत आहेत. बहुतांश कामांच्या मस्टरवर बोगस मजुर दाखविण्याचे प्रकार घडल्याचे आता उघड होत आहे. त्यामुळे या प्रकरणांची व्यापकता लक्षात घेवून वन विभागातील वरिष्ठ    अधिका:यांनी आता ठोस कारवाईची गरज आहे.