लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रकाशा ते नंदुरबार रस्त्यावर एलसीबीच्या पथकाने रिक्षातून अवैध दारुसह एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला़ शनिवारी पथकाने ही कारवाई केली़ नंदुरबार येथून प्रकाशाकडे अवैध मद्य वाहून नेण्यात येत असल्याची माहिती एलबीची पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मिळाली होती़ यातून त्यांनी पथकासह कोळदा गावाच्या पुढे सापळा रचला होता़ यावेळी प्रकाशाकडे भरधाव वेगात जाणारी रिक्षा पथकाला दिसून आली़ त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने रिक्षा पुढे दामटली़ पथकाने पाठलाग करुन रिक्षा थांबवल्यानंतर त्यात अवैध दारुचा साठा मिळून आला़ रिक्षात देशीविदेशी मद्य आणि बियरच्या बाटल्या असा एकूण 33 हजार रुपये किंमतीचा साठा मिळून आला़ पथकाने रिक्षाचालक तुषार गोपाळ उर्फ वसंत गुरव रा़ प्रकाशा ता़ शहादा यास ताब्यात घेत त्याच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन ताब्यात देण्यात आल़े ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नवले, पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल पंढरीनाथ ढवळे, प्रदीप राजपूत, विकास पाटील, रविंद्र पाडवी, विनोद जाधव, जितेंद्र तांबोळी, जितेंद्र अहिरराव, विकास अजगे, महेंद्र सोनवणे, अविनाश चव्हाण, किरण पावरा, जितेंद्र ठाकूर, सतीष घुले, विजय ढिवरे, राजेंद्र काटके यांच्या पथकाने केली़
प्रकाशा-नंदुरबार रस्त्यावर रिक्षातून अवैध दारुसह लाखाचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:17 IST