मजुरांच्या रिक्षाला अपघात, एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 12:31 PM2020-10-30T12:31:20+5:302020-10-30T12:31:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धानोरा ते नंदुरबार रस्त्यावर पिंपळोद गावाचा शिवारातील वळणावर मिरची तोडण्यासाठी मजूर घेऊन जाणारी ॲपेरिक्षा ...

Labor rickshaw accident, one killed | मजुरांच्या रिक्षाला अपघात, एक ठार

मजुरांच्या रिक्षाला अपघात, एक ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : धानोरा ते नंदुरबार रस्त्यावर पिंपळोद गावाचा शिवारातील वळणावर मिरची तोडण्यासाठी मजूर घेऊन जाणारी ॲपेरिक्षा उलटल्याने अपघात झाला. या अपघातात १ महिला ठार तर  ५ जण जखमी झाले. जखमींना  जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
वाहन चालक अमरसिंग जेमाभाई वळवी रा. गामडी, ता.निझर याच्या ताब्यातील ॲपेरिक्षा (क्र.जी.जे २६ टी ४०३६) रायगड ता. निझर गावातून पाचोराबारी ता. नंदुरबार येथे मिरची तोडण्यासाठी मंजुरीकरिता धानोरा मार्गे वाहन नेत असतांना पिंपळोद गावाच्या शिवारात वसंत पाटील यांचा शेता जवळील वळण रस्त्यावर सकाळी ८ वाजेच्या सुमारास पिंपळोळ गावाकडून येणारी दुचाकी अचानक ॲपेरिक्षाला धडकल्याने रिक्षा चालकाचा ताबा सुटला. ताबा सुटताच वाहन रस्त्याच्या पलीकडे उलटल्याने अपघात झाला. 
या अपघातात ॲपेरिक्षातील मजूर महिला सुनीता चंद्रसिंग वसावा (३०)  रा.रायगड ता. निझर ठार झाली. तर दिपीका वासू गावित,चंद्राबेन महेंद्र वसावा, कल्‍पना वासू गावित, राहुल कांतीलाल नाईक, विपेश वसंत वळवी सर्व रा.रायगड ता.निझर जखमी   झाले.
अपघात झाल्यानंतर तात्काळ १०८ रुग्णवाहिकेतून जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.त्याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. घटनास्थळी उपनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी पाहणी केली. अपघात प्रकरणी विपेश वळवी यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानुसार, ॲपेरिक्षा चालक 
अमरसिंग जेमाभाई वळवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदयसिंग वळवी करीत आहेत.

जखमींमध्ये मुलींचाही समावेश
जखमींमध्ये कामासाठी जाणाऱ्या लहान मुलींचा देखील समावेश होता. त्यामुळे जखमी झाल्यानंतर त्यांना होणाऱ्या वेदनांमुळे त्या विव्हळत होत्या. त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या नातेवाईक महिलांनी रुग्णवाहिका येईपर्यत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या तसेच पिंपळोद ग्रामस्थांनी देखील मदतीचा हात दिला. रुग्णवाहिका आल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी व मयत हे गुजरात राज्यातील आहेत. 

Web Title: Labor rickshaw accident, one killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.