यावेळी तालुका कृषी अधिकारी बापू गावीत, मंडळ कृषी अधिकारी नितीन गांगुर्डे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या मोहिमेंतर्गत उमराण गटातील तिनमौली, नवागाव, वाटवी, सुकवेल, डोकारे, करंजवेल, पाचंबा, देवलीपाडा, बंधारे, बिलबारा, दुधवे, वावडी, बिलगव्हान, चेडापाडा, बिलीपाडा मेनतलाव, डाळीआंबा या गावांतील शेतकऱ्यांना भात, सोयाबीन व कापूस बियाणे वाटप जिल्हा परिषद सदस्य अजित नाईक, नवागाव सरपंच प्रकाश नाईक, तालुका कृषी अधिकारी नवापूर बापूसाहेब गावीत यांच्या हस्ते व मंडळ कृषी अधिकारी चिंचपाडा नितीन गांगुर्डे, कृषी सहाय्यक टी.के. वळवी, नुरजी वसावे, नरपत वसावे, अशोक नाईक, कांतिलाल नाईक, मोतीराम नाईक, रमेश वसावे, मलामजी वसावे, मनिलाल वसावे, विविध शेतकरी गट अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य व कृषी विभागातील कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सदर गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवागाव येथे कृषी संजीवनी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:21 IST