शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कोठली ग्रामपंचायत झाली ‘पेपरलेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 13:01 IST

जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत : संपूर्ण संगणकीकरण

संतोष सूर्यवंशी । लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 25 : नंदुरबार तालुक्यातील कोठली खुर्द ग्रामपंचायत जिल्ह्यातील पहिली ‘पेपरलेस’ ग्रामपंचायत झाली आह़े ग्रामपंचायतीकडून सर्व दाखले ऑनलाईन पध्दतीने देण्यात येत असून ग्रामपंचायतीचा कारभारदेखील फायलीमुक्त होणार आह़े येथील कर्मचा:यांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले असून तेही आता ‘टेकAोसेव्ही’ होत असल्याचे दिसून येत आह़ेशासकीय कामकाज म्हटले म्हणजे कार्यालयांमध्ये फायलींचे गठ्ठे, सर्वत्र दिसून येणारे शासकीय कागपत्रांचे ढिग व त्यावर साचलेली धुळ आदी विदारक चित्र असत़े त्यामुळे शासकीय कार्यालयांचे जास्तीत जास्त कामकाज हे ‘पेपरलेस’ व ‘टेकAोसेव्ही’ पध्दतीने व्हावे यासाठी शासनाकडून आग्रह धरण्यात येत आह़े ‘पेपरलेस’ व्यवहारामुळे स्मार्टवर्कसोबत पर्यावरणाचाही समतोल राखण्यास मदत होत असत़े हेच गांर्भीय ओळखत नंदुरबार तालुक्यातील कोठली खुर्द ग्रामपंचायतीने ‘पेपरलेस’ काम करण्याचे शिवधनुष पेलण्याचा निर्णय घेतला़ सुरुवातीला याबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात आल़े परंतु सर्व विचाराअंती गेल्या 1 एप्रिलपासून ग्रामपंचायतीत सर्व व्यवहार ‘पेपरलेस’ पध्दतीने सुरळीत होत आहेत़ त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी तसेच कर्मचा:यांचाही आत्मविश्वास आता दुनावला आह़े ग्रामपंचायतीत होत असलेल्या या बदलाला गावातील ग्रामस्थांनीही सकारात्मक पध्दतीने स्विकारलेले दिसून येत आह़े  ‘पेपरलेस’ कारभारासाठी ग्रामस्थांकडूनही मोठी मदत मिळत असल्याचे सांगण्यात येत आह़े ग्रामपंचायतीअंतर्गत सुरु असलेले विविध कामे ई-ग्राम या सॉफ्टवेअरव्दारे करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आह़े त्यात, जन्म-मृत्यू दाखले, घरपट्टीची पावती, सात नंबरचा सामान्य व वैयक्तिक उतारा, रहिवासी दाखला, विविध करांची वसुली पावती आदींचा समावेश आह़ेया सॉफ्टवेअरमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यास शासनाच्या हेल्पलाईन नंबरव्दारे तक्रार नोंदणीची सुविधादेखील उपलब्ध होत असल्याचे सांगण्यात आल़े यासोबतच ग्रामपंचायतीचे सर्व रेकॉर्डही आता ऑनलाईन ‘सेव्ह’ करण्यात येणार आह़े