नंदुरबार : तळोदा तालुक्यातील दसवड फाट्याजवळ वाहन उलटल्याने एकजण ठार झाल्याची घटना रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली होती़ याप्रकरणी मयताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़गोपालभाई भिकाभाई भारिया रा़ छोटा उदेपूर, गुजरात असे मयताचे नाव आहे़ रविवारी जीजे ३४ पी ५१८१ या चारचाकी वाहनाने गोपालभाई भारिया हे नातलगांसह शहादा येथून छोटा उदेपूरकडे जात असताना बºहाणपूर-अंकलेश्वर राज्यमार्गावर दसवड फाट्याजवळ कारमध्ये बिघाड झाला़ यावेळी त्यांनी वाहनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करुनही शक्य झाले नाही़ यात वाहन उलटल्याने गोपाल भारिया हे जखमी झाले़ रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला़ अपघातात सोबत असलेल्या इतरांनाही मुकामार लागल्याची माहिती आहे़याबाबत हरेशकुमार रमेशभाई भारिया रा़ छोटा उदेपूर, गुजरात याने तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन मयत चालक गोपालभाई भारिया याच्याविरोधात स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरला म्हणून गुन्हा दाखल आहे़ पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय ठाकरे करत आहेत़
दसवड फाट्याजवळ चारचाकी उलटून एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 11:46 IST